उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री फडणवीसांना ढेकूण म्हणत जहरी टीका

सध्या राज्यात राजकारण पुन्हा तापले आहे. येत्या काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका होणार आहे. राजकीय पक्ष याचा तयारीला लागले आहे. राजकीय व्यक्तव्यांनी राजकीय वातावरण तापू लागले आहे. शनिवारी पुण्यात एका कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी …

उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री फडणवीसांना ढेकूण म्हणत जहरी टीका

सध्या राज्यात राजकारण पुन्हा तापले आहे. येत्या काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका होणार आहे. राजकीय पक्ष याचा तयारीला लागले आहे. राजकीय व्यक्तव्यांनी राजकीय वातावरण तापू लागले आहे. शनिवारी पुण्यात एका कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करत त्यांना ढेकूण म्हटले. तसेच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधत त्यांना अहमदशाह अब्दाली म्हटले आहे. 

देवेंद्र फडणवीसांना टोमणा लगावत ते म्हणाले, की काही लोकांना असे वाटते की मी त्यांना म्हटले की या तर तुम्ही राहणार किंवा मी राहणार पण मी ढेकूणांच्या नादी लागत नाही. माझ्या मार्गात येऊ नका. ती तुमची क्षमता नाही. ढेकूण नेहमी अंगठ्याखाली ठेचले जातात. 

 

शनिवारी पुण्यात एका सभेत शिवसेना युबीटीचे नेते उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमितशाह यांच्यावर निशाणा साधत त्यांना अहमदशाह अब्दालीचे राजकीय वंशज असल्याचे म्हटले. नंतर ते म्हणाले, आजपासून मी अमितशहांना अब्दाली म्हणणार. मला तुम्ही बनावट ठाकरे म्हणाल तर मी असेच म्हणणार 

अब्दालीचे वंशज आम्हाला हिंदुत्व शिकवणार. मुस्लिम मुला -मुलींनी लग्न केले तर त्याला लव्ह जिहाद म्हणतात.  आपण मुस्लिम लोकांसाठी जे काही करता ते काय आहे? असे ते म्हणाले.

 Edited by – Priya Dixit  

 

Go to Source