उद्धव ठाकरे गटाच्या आमदाराचा शिंदे शिवसेनेत प्रवेश

उद्धव ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकी नंतर मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे माजी मंत्री आणि आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी ठाकरे गटाला सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांनी स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेतल्याचा आरोप मुंदडा यांनी …

उद्धव ठाकरे गटाच्या आमदाराचा शिंदे शिवसेनेत प्रवेश

उद्धव ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकी नंतर मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे माजी मंत्री आणि आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी ठाकरे गटाला सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांनी स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेतल्याचा आरोप मुंदडा यांनी केला आहे. 

जयप्रकाश मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.लोकसभा निवडणुकीत स्थानिक पदाधीकाऱ्यांचं म्हणणे एकूण घेतले नाही आणि परस्पर उमेदवारी जाहीर केली. तसेच गेल्या काही वर्षांपासून त्यांना डावलण्याचा आरोप त्यांनी केला.  

 

जयप्रकाश मुंदडा यांनी आपल्याला गेल्या काही वर्षात ठाकरे यांनी डावलले आहे. तसेच पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत त्यांनी ठाकरे गटाला राम राम करत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शुक्रवारी हा प्रवेश सोहळा पार पडला जयप्रकाश मुंदडा हे हिंगोली विधानसभा मतदार संघातून 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले असून ते राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री होते. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुंदडा यांचे स्वागत करून भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिला. 

Edited by – Priya Dixit   

Go to Source