एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी: उद्धव ठाकरे
वरळीतील ऐतिहासिक मराठी मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल दोन दशकांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. मराठी अस्मिता, भाषा, संस्कृती आणि राजकीय स्वाभिमानाच्या मुद्द्यांवर या दोघांनी स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडली.उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्देहिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही आणि जर मराठीसाठी आवाज उठवणं गुंडगिरी असेल तर होय, आम्ही गुंड आहोत! बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणून आपण आजही त्याच विचारांसोबत उभं असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं.आज मला कल्पना आहे, की अनेक बुवा, महाराज हे बिझी आहेत. कोण लिंब कापतंय, कोण टाचण्या मारतंय, कोण गावी जाऊन अंगारे धुपारे करत असेल, रेडे कापत असतील त्या सगळ्यांना सांगतो या भोंदूपणा विरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता. त्यांच्या समोर आम्ही वारसदार म्हणून उभे ठाकलेलो आहोत.मधल्या काळामध्ये अगदी दोघांनी मी काय राजने काय अगदी सगळ्यांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं. आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत. हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. मराठी बोलणारे तुमच्यापेक्षाही जास्त कट्टर, कडवट देशाभिमानी हिंदू आहेत. तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवताय? भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही. जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल तर त्याला तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत. न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाहीये आणि जर का तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूचहळुवारपणाने सगळं काही एक एक करत हिंदी हिंदू हिंदुस्थान.. हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे पण हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही. तुम्ही कितीही कमिटया करा हिंदीची सक्ती तुमच्या सात पिढ्या उतरल्या तरी लावू देत नाही14 वर्षांनंतर तुम्ही मुंबई आणि महाराष्ट्राचे जे काही लचके तोडलेत.. मुंबईतून, महाराष्ट्रातून उद्योगधंदे सगळे पळवले. आर्थिक केंद्र गेलं, हीरे व्यापार गेला, मोठमोठे ऑफिसेस गेली, आपल्याकडे येणारे उद्योगधंदे जे आपल्या काळात येत होते ते कुठे गेले?काहीजण म्हणतात यांचा ‘म’ मराठीचा नाही, महापालिकेचा आहे..अरे नुसता महापालिकेचा नाही महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबिज करू. एका बाजूला मोदींचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी कर्जबाजारी झालाय.. त्याला बैल मिळत नाही.. त्या नांगराचं जोखड घेऊन शेती करतोय आणि तिकडे यांच्या गळ्यामध्ये ‘स्टार ऑफ घाणा’ लाज वाटली पाहिजेकाल एक गद्दार ‘जय गुजरात’ बोलला. अरे किती लाचारी करायची? हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल का? आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर ‘जय गुजरात’ म्हणणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल का?”शेवटी एक आवाहन करतो सगळ्या मराठी बांधवांना, मराठी प्रेमींना.. तुटू नका, फुटू नका आणि मराठी ठसा पुसू नकाहेही वाचा20 वर्षांनंतर उद्धव-राज ठाकरे एकत्र
राज ठाकरेंच्या भाषणातील 9 महत्त्वाचे मुद्दे
Home महत्वाची बातमी एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी: उद्धव ठाकरे
एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी: उद्धव ठाकरे
वरळीतील ऐतिहासिक मराठी मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल दोन दशकांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. मराठी अस्मिता, भाषा, संस्कृती आणि राजकीय स्वाभिमानाच्या मुद्द्यांवर या दोघांनी स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडली.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्देहिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही आणि जर मराठीसाठी आवाज उठवणं गुंडगिरी असेल तर होय, आम्ही गुंड आहोत!
बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणून आपण आजही त्याच विचारांसोबत उभं असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं.
आज मला कल्पना आहे, की अनेक बुवा, महाराज हे बिझी आहेत. कोण लिंब कापतंय, कोण टाचण्या मारतंय, कोण गावी जाऊन अंगारे धुपारे करत असेल, रेडे कापत असतील त्या सगळ्यांना सांगतो या भोंदूपणा विरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता. त्यांच्या समोर आम्ही वारसदार म्हणून उभे ठाकलेलो आहोत.
मधल्या काळामध्ये अगदी दोघांनी मी काय राजने काय अगदी सगळ्यांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं. आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत.
हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. मराठी बोलणारे तुमच्यापेक्षाही जास्त कट्टर, कडवट देशाभिमानी हिंदू आहेत. तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवताय?
भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही. जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल तर त्याला तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत. न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाहीये आणि जर का तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूच
हळुवारपणाने सगळं काही एक एक करत हिंदी हिंदू हिंदुस्थान.. हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे पण हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही. तुम्ही कितीही कमिटया करा हिंदीची सक्ती तुमच्या सात पिढ्या उतरल्या तरी लावू देत नाही
14 वर्षांनंतर तुम्ही मुंबई आणि महाराष्ट्राचे जे काही लचके तोडलेत.. मुंबईतून, महाराष्ट्रातून उद्योगधंदे सगळे पळवले. आर्थिक केंद्र गेलं, हीरे व्यापार गेला, मोठमोठे ऑफिसेस गेली, आपल्याकडे येणारे उद्योगधंदे जे आपल्या काळात येत होते ते कुठे गेले?
काहीजण म्हणतात यांचा ‘म’ मराठीचा नाही, महापालिकेचा आहे..अरे नुसता महापालिकेचा नाही महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबिज करू.
एका बाजूला मोदींचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी कर्जबाजारी झालाय.. त्याला बैल मिळत नाही.. त्या नांगराचं जोखड घेऊन शेती करतोय आणि तिकडे यांच्या गळ्यामध्ये ‘स्टार ऑफ घाणा’ लाज वाटली पाहिजे
काल एक गद्दार ‘जय गुजरात’ बोलला. अरे किती लाचारी करायची? हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल का? आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर ‘जय गुजरात’ म्हणणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल का?”
शेवटी एक आवाहन करतो सगळ्या मराठी बांधवांना, मराठी प्रेमींना.. तुटू नका, फुटू नका आणि मराठी ठसा पुसू नकाहेही वाचा
20 वर्षांनंतर उद्धव-राज ठाकरे एकत्रराज ठाकरेंच्या भाषणातील 9 महत्त्वाचे मुद्दे