ओसरगाव – गवळवाडी येथील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

आ. नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी झाला प्रवेश कणकवली / प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील ओसरगाव गवळवाडी येथील उबाठा पक्षाचे कार्यकर्ते सदानंद मोरे, शिवराम मोरे, गणेश मोरे, प्रमोद मोरे, प्रभाकर देसाई, विनोद देसाई, प्रथमेश देसाई, अतुल मोरे, रवी बंटीवरडार, रदीर बेनेटी, परशुराम मोरे, विलास राणे, स्वप्निल राणे, उषा देसाई, प्रतिक्षा देसाई, प्रमिला देसाई, जानवी मोरे, दिशा […]

ओसरगाव – गवळवाडी येथील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

आ. नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी झाला प्रवेश
कणकवली / प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील ओसरगाव गवळवाडी येथील उबाठा पक्षाचे कार्यकर्ते सदानंद मोरे, शिवराम मोरे, गणेश मोरे, प्रमोद मोरे, प्रभाकर देसाई, विनोद देसाई, प्रथमेश देसाई, अतुल मोरे, रवी बंटीवरडार, रदीर बेनेटी, परशुराम मोरे, विलास राणे, स्वप्निल राणे, उषा देसाई, प्रतिक्षा देसाई, प्रमिला देसाई, जानवी मोरे, दिशा मोरे, सुहासिनी मोरे, महेश वारंग यांनी ओम गणेश निवासस्थानी येथे भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून ओसरगाव गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.आमदार नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, राहुल आंगणे सुदर्शन नाईक व इतर उपस्थित होते.