पुण्यात डिजिटल अरेस्टच्या प्रकार, नागरिकाला 10 कोटींना लुटले दोघांना अटक

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून एका ज्येष्ठ नागरिकाला ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत तब्बल 10 कोटी गंडा घालणाऱ्या दोघांना अटक केली.आरोपींनी एटीएममधून पैसे काढण्याची चूक केली आणि तेच त्यांच्या अटकेचे मुख्य कारण ठरले.

पुण्यात डिजिटल अरेस्टच्या प्रकार, नागरिकाला 10 कोटींना लुटले दोघांना अटक

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून एका ज्येष्ठ नागरिकाला ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत तब्बल 10 कोटी गंडा घालणाऱ्या दोघांना अटक केली.आरोपींनी एटीएममधून पैसे काढण्याची चूक केली आणि तेच त्यांच्या अटकेचे मुख्य कारण ठरले.

ALSO READ: पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; इको कारची टेम्पोशी टक्कर झाल्याने तीन जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआय असल्याचे भासवून एका ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्टची भीती घालत दोन सायबर चोरट्यांनी 10 कोटींचा गंडा घातला. या प्रकरणी दोघांना पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. 

हर्षद सुभाष धन्तोले(23) आणि समर्थ सुरेश देशमुख (24) अशी आरोपींची नावे आहेत.
 ALSO READ: पुणे पोर्श अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालया कडून महाराष्ट्र सरकारला नोटीस

या दोघांनी तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइलवर संपर्क साधून आपण सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले आणि तुमच्या बँक खात्याचा वापर काळ्या पैशांच्या व्यवहारासाठी झाला असून या प्रकरणात तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला अटक करण्यात येऊ शकते.  अशी भीती घालून त्यांना तातडीने या प्रकरणातून बाहेर पाडण्यासाठी पैसे जमा करण्यास सांगितले. घाबरलेल्या पीडित ज्येष्ठ नागरिकांनी आरोपीने सांगितल्या प्रमाणे खात्यात १० कोटींहून अधिक रक्कम जमा केली.
 

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडिताने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला असता, आरोपींनी फसवणुकीची रक्कम काही बँक खात्यांतून शहरातील विविध एटीएमद्वारे काढल्याचे समोर आले. 

ALSO READ: पुणे स्पा सेंटरवर छापा; घाबरलेल्या महिलेने इमारतीवरून उडी मारल्याने मृत्यू

सहसा सायबर गुन्हेगार पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करतात, मात्र या आरोपींनी प्रत्यक्ष रोख रक्कम काढल्याने ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. या चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांनी त्यांची ओळख पटवून त्यांना कर्वेनगर परिसरातून ताब्यात घेतले.
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जर आरोपींनी एटीएममधून पैसे काढले नसते,तर त्यांचा शोध लागला नसता.

सध्या पोलीस या प्रकरणातील इतर दुव्यांचा शोध घेत असून, अशा प्रकारे कोणालाही ‘डिजिटल अरेस्ट’ करता येत नाही, त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Edited By – Priya Dixit 

Go to Source