पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सांबरा मार्गावर दुतर्फा बॅरिकेड्स

वार्ताहर /सांबरा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बेळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पूर्व खबरदारी घेतली असून बेळगाव-सांबरा मार्गावर ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेड्स उभारले आहेत. भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवार दि. 28 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची बेळगाव येथे प्रचारसभा होणार आहे. यासाठी त्यांचे शनिवारी बेळगाव शहरात आगमन होणार असून प्रशासनाने सर्व ती खबरदारी घेतलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सांबरा विमानतळावर […]

पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सांबरा मार्गावर दुतर्फा बॅरिकेड्स

वार्ताहर /सांबरा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बेळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पूर्व खबरदारी घेतली असून बेळगाव-सांबरा मार्गावर ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेड्स उभारले आहेत. भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवार दि. 28 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची बेळगाव येथे प्रचारसभा होणार आहे. यासाठी त्यांचे शनिवारी बेळगाव शहरात आगमन होणार असून प्रशासनाने सर्व ती खबरदारी घेतलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सांबरा विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते बेळगाव शहराकडे जाणार आहेत. त्यांचा ताफा जाताना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. शुक्रवारी सकाळपासून बॅरिकेड्स उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.