दोन विद्यार्थ्यांना कराटे ब्लॅक बेल्ट

बेळगाव जिल्हा क्रीडा संघटनेच्या दोन खेळाडूचा समावेश बेळगाव : इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा क्रिडा संघटनेच्या दोन विद्यार्थ्यांना ब्लॅकबेल्ट प्रदान करण्यात आला. ब्रम्हदेव समुदाय भवन मजगाव येथे बेळगाव कराटेची बेल्ट परीक्षा पार पडली. या परीक्षेत एकूण  80 कलर बेल्ट कराटेपटू सहभागी झाले होते. तर टॉप दोन ब्लॅकबेल्ट विद्यार्थी जयकुमार मिश्रा  आणि सक्षम हंडे. या […]

दोन विद्यार्थ्यांना कराटे ब्लॅक बेल्ट

बेळगाव जिल्हा क्रीडा संघटनेच्या दोन खेळाडूचा समावेश
बेळगाव : इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा क्रिडा संघटनेच्या दोन विद्यार्थ्यांना ब्लॅकबेल्ट प्रदान करण्यात आला. ब्रम्हदेव समुदाय भवन मजगाव येथे बेळगाव कराटेची बेल्ट परीक्षा पार पडली. या परीक्षेत एकूण  80 कलर बेल्ट कराटेपटू सहभागी झाले होते. तर टॉप दोन ब्लॅकबेल्ट विद्यार्थी जयकुमार मिश्रा  आणि सक्षम हंडे. या दोन्ही विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होऊन विविध ठिकाणी पदके मिळविली. प्रमुख अतिथी म्हणून  सुकुमार गौरन्ना, शिवाजी पट्टण, सुनिता देसाई, गजेंद्र काकतीकर यांच्या हस्ते ब्लॅकबेल्ट ,प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच त्यांच्या पालकांना सुद्धा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. ही परिक्षा यशस्वी करण्यासाठी इंडियन कराटे क्लबच्या लेडी चीफ इंस्ट्रक्टर हेमलता  काकतीकर,  प्रशिक्षक प्रभाकर किल्लेकर, परशुराम काकती, निलेश गुरखा, विनायक दंडकर, ,परशराम नेकनार, कृष्णा देवगाडी, संजना शिंदे, सुनिधी कणबरकर, सौरभ मजुकर, रतिक लाड , कृष्णा जाधव , वचना देसाई आणि दिपा भोजगार  यांनी विशेष परिश्रम घेतले.