दोन सख्ख्या बहिणी अपघातात ठार
होनग्याजवळ महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक : वाहनाचा शोध सुरू
बेळगाव : अज्ञात वाहनाने ठोकरल्याने महामार्ग ओलांडणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री होनग्याजवळ ही घटना घडली असून काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. अपघातानंतर अज्ञात गुड्स वाहनचालकाने आपल्या वाहनासह पलायन केल्याचे पोलिसांनी सांगितले. निला सदाशिव कोरे (वय 43) राहणार मारुतीनगर, मणगुत्ती, तिची बहीण महादेवी अशोक नावलगी (वय 52) राहणार लक्ष्मी गल्ली, होनगा अशी त्या दुर्दैवी बहिणींची नावे आहेत. शनिवार दि. 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. एका लग्न समारंभासाठी होनग्याहून वडगावला जाताना ही घटना घडली आहे.निला व महादेवी या बहिणी होनगा येथील एका खासगी कारखान्यात काम करीत होत्या.
कुटुंबातील सहा महिला शनिवारी सायंकाळी एका नातेवाईकांच्या लग्न समारंभात भाग घेण्यासाठी वडगावला निघाल्या होत्या. चौघीजणी पुढे आल्या. निला व महादेवी त्यांच्या पाठीमागून चालत येत होत्या. महामार्ग ओलांडताना अज्ञात गुड्स वाहनाची धडक बसून त्या गंभीर जखमी झाल्या. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही बहिणींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. तेथे पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रविवारी दोन्ही मृतदेहांवर उत्तरीय तपासणी करून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. निला यांच्या पश्चात दोन मुली, दोन बहिणी, भाऊ असा परिवार आहे. महादेवी यांच्या पश्चात एक मुलगी, दोन बहिणी, भाऊ असा परिवार आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून या अपघाताला कारणीभूत वाहनाचा शोध घेण्यात येत आहे.
Home महत्वाची बातमी दोन सख्ख्या बहिणी अपघातात ठार
दोन सख्ख्या बहिणी अपघातात ठार
होनग्याजवळ महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक : वाहनाचा शोध सुरू बेळगाव : अज्ञात वाहनाने ठोकरल्याने महामार्ग ओलांडणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री होनग्याजवळ ही घटना घडली असून काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. अपघातानंतर अज्ञात गुड्स वाहनचालकाने आपल्या वाहनासह पलायन केल्याचे पोलिसांनी सांगितले. निला सदाशिव कोरे (वय 43) राहणार मारुतीनगर, मणगुत्ती, तिची बहीण महादेवी अशोक नावलगी (वय 52) राहणार लक्ष्मी गल्ली, […]
