जुन्नरमध्ये शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू

जुन्नरमध्ये शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची घटना ईदगाह मैदानाजवळ घडली आहे. आफान अफसर इनामदार (10) आणि रिफत अफसर इनामदार (7) असे या मुलांची नावे आहे.

जुन्नरमध्ये शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू

जुन्नरमध्ये शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची घटना ईदगाह मैदानाजवळ घडली आहे. 

आफान अफसर इनामदार (10) आणि रिफत अफसर इनामदार (7) असे या मुलांची नावे आहे. 

ALSO READ: आठवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली; जालना मधील घटना

सदर घटना शनिवारी दुपारी घडली आहे. हे दोघे दुपारी 4 वाजेच्या सुमारास खेळण्यासाठी घरातून बाहेर पडले. मात्र संध्याकाळ झाली तरीही ते घरी परतले नाही. या वरून त्यांची शोधाशोध सुरु झाली. 

सध्या परिसरात बिबट्यांचा वावर असल्यामुळे वन विभाग, पोलीस पथक आणि ड्रोन टीम देखील मुलांच्या शोध घेऊ लागली. 

ALSO READ: भाषेचा वादातून विद्यार्थ्याची आत्महत्या प्रकरणी चिथावणीखोरीचा गुन्हा दाखल; कुटुंबाला न्याय देण्याचे एकनाथ शिंदे म्हणाले

शोध करताना मुलनाचे बूट, चपला, शेततळ्याच्या काठावर आढळल्या. त्यांनतर तळाचा शोध घेताना रेस्क्यू टीम ने दोन्ही मुलांना बाहेर काढले आणि तातडीने रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.

मुलांचे वडील दुबईला नौकरी निमित्ते गेल्याने मुले आई आणि आजीजवळ राहतात. या घटनेमुळे मुलांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. 

 

Edited By – Priya Dixit 

ALSO READ: अर्णव खरे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर मुंबईतील राजकारण तापले

Go to Source