घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या दोघा जणांना अटक
खाजा अस्लम शेखची माहिती देण्याचे आवाहन
बेळगाव : शिवबसवनगर येथील एका डॉक्टरांच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा जणांना माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून ही कारवाई केली असून बेळगावात चोरी करण्यासाठी हुबळी-धारवाडहूनही चोर बोलावून घेण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. एका नामचीन गुन्हेगाराविषयी माहिती देण्याचे आवाहनही केले आहे. इरफान खताल शेख (वय 30), अर्जुन कल्लाप्पा नायक (वय 30, दोघेही राहणार सत्यसाई कॉलनी, वैभवनगर) अशी त्यांची नावे आहेत. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व सहकाऱ्यांनी अटक केली असून या तिघांवर 20 ते 25 गुन्हे नोंद आहेत. खाजा अस्लम उर्फ रफीक सय्यद उर्फ शेख (वय 34, रा. सत्यसाई कॉलनी वैभवनगर) याच्या शोधासाठी जाळे विणले आहे.
खाजा अस्लम शेख हा बेळगाव, हुबळी-धारवाडहून वेगवेगळ्या गुन्हेगारांना चोरी करण्यासाठी बोलावून घेऊन रात्रीच्यावेळी घरफोड्या करतो. चोरीतील दागिने विकून गोव्यात कॅसिनोमध्ये तो पैसे उधळतो. त्याला जुगाराचाही नाद असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. वरचेवर तो पत्ता बदलत असतो. खाजाविषयी कोणाला माहिती असल्यास 112 किंवा पोलीस कंट्रोलरूमला माहिती देण्याचे आवाहन केले आहे. इरफान व अर्जुन हे दोघे 1 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 1 वाजता चोरी करण्यासाठी शिवबसवनगर परिसरात आले होते. मध्यरात्री 3 वाजता त्यांनी एका डॉक्टराचे घर फोडण्याचे प्रयत्न केले आहेत. सतत प्रयत्न करूनही त्यांना इंटरलॉक फोडता आला नाही. चोरट्यांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
Home महत्वाची बातमी घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या दोघा जणांना अटक
घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या दोघा जणांना अटक
खाजा अस्लम शेखची माहिती देण्याचे आवाहन बेळगाव : शिवबसवनगर येथील एका डॉक्टरांच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा जणांना माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून ही कारवाई केली असून बेळगावात चोरी करण्यासाठी हुबळी-धारवाडहूनही चोर बोलावून घेण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. एका नामचीन गुन्हेगाराविषयी माहिती देण्याचे आवाहनही केले आहे. इरफान खताल शेख (वय 30), […]