दोन कुख्यात शार्प शूटर्सना कळंगुट, हणजुणेत अटक
हरियाणा पोलिसांची यशस्वी कारवाई
पणजी : गोवा हे गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले आहे. देशभरात कुठेही गुन्हेगार गुन्हे करतात आणि गोव्यात येऊन आश्रय घेतात. गोवा गुन्हेगारांना सुरक्षित स्थान असल्याचे अनेकवेळा उघड झाले आहे. असाच आणखी एक प्रकार झाला असून नफे सिंह राठी हत्या प्रकरणात हरियाणा पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. गेल्या महिन्यात हरियाणातील इंडियन नॅशनल लोक दल (आयएनएलेडी) चे प्रमुख नफे सिंग राठी यांच्या हत्येमध्ये सामील असलेल्या दोन शार्प शूटर्सना काल सोमवारी गोव्यात अटक करण्यात आली आहे. झज्जर पोलीस, हरियाणा एसटीएफ आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने संयुक्त मोहीम राबवत सौरव आणि आशिष या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई कळंगूट आणि हणजूण भागात करण्यात आली असून याकामी गोवा पोलिसांचीही मदत लाभली. अटक करण्यात आलेले दोन्ही स़ंशयित शार्प शूटर्स असल्याचे सांगण्यात येत आहे. हे दोन्ही संशयित दिल्लीतील नांगलोई भागातील रहिवासी आहेत. यासोबतच या दोघांचा कपिल सांगवान उर्फ नंदू टोळीशी संबंध असल्याचेही समोर आले आहे. दोन्ही शूटर्सना अटक केल्यानंतर पोलीस त्यांना सकाळच्या विमानाने झज्जरला घेऊन गेले. आशिष आणि सौरव हाती लागल्यानंतर झज्जर पोलिस इतर दोघांचा शोध घेत आहेत. आयएनएलडीच्या हरियाणा युनिटचे अध्यक्ष राठी आणि त्यांच्या सोबत असलेले पक्षाचे कार्यकर्ते जयकिशन यांची 25 फेब्रुवारी रोजी बहादुरगड, झज्जर येथे अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनावर अंदाधुंद गोळीबार करून हत्या केली होती. या घटनेपासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Home महत्वाची बातमी दोन कुख्यात शार्प शूटर्सना कळंगुट, हणजुणेत अटक
दोन कुख्यात शार्प शूटर्सना कळंगुट, हणजुणेत अटक
हरियाणा पोलिसांची यशस्वी कारवाई पणजी : गोवा हे गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले आहे. देशभरात कुठेही गुन्हेगार गुन्हे करतात आणि गोव्यात येऊन आश्रय घेतात. गोवा गुन्हेगारांना सुरक्षित स्थान असल्याचे अनेकवेळा उघड झाले आहे. असाच आणखी एक प्रकार झाला असून नफे सिंह राठी हत्या प्रकरणात हरियाणा पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. गेल्या महिन्यात हरियाणातील इंडियन नॅशनल लोक दल […]