खानापूर आगाराला दोन नवीन बसेस

नंदगड : खानापूर तालुक्याचा विस्तार मोठा आहे. त्यातच निम्म्याहून अधिक भाग जंगल भागात मोडतो. पावसाळ्dयात या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने नेहमीच रस्ते नादुरुस्त होतात. परिणामी बसेस नादुरुस्त होण्याचे प्रकार घडतात. यावेळी प्रवाशांचे हाल होतात. त्यातच बऱ्याच बसेस जुन्या असल्याने असे प्रसंग वारंवार होत असतात. यासाठी खानापूर आगाराला दहा बसेस देण्यात याव्यात, अशा मागणीचे […]

खानापूर आगाराला दोन नवीन बसेस

नंदगड : खानापूर तालुक्याचा विस्तार मोठा आहे. त्यातच निम्म्याहून अधिक भाग जंगल भागात मोडतो. पावसाळ्dयात या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने नेहमीच रस्ते नादुरुस्त होतात. परिणामी बसेस नादुरुस्त होण्याचे प्रकार घडतात. यावेळी प्रवाशांचे हाल होतात. त्यातच बऱ्याच बसेस जुन्या असल्याने असे प्रसंग वारंवार होत असतात. यासाठी खानापूर आगाराला दहा बसेस देण्यात याव्यात, अशा मागणीचे निवेदन विविध संघ संस्थांकडून व नागरिकांकडून संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. अखेर या बस आगाराला दोन नव्या बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे काहीअंशी पुरेशा बसअभावी आगाराचे कोलमडलेले वेळापत्रक रुळावर येण्यास मदत होण्याची शक्यता आहे.