हिंडलगा कारागृहात पुन्हा दोन मोबाईल-एक सीमकार्ड जप्त
अधिकाऱ्यांकडून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ बेळगाव
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील दोन बराकीमध्ये दोन मोबाईल आणि एक एअरटेल कंपनीचे सीम आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकरणी कारागृह अधिकारी बसवराज वाय. बजंत्री यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञाताविरोधात फिर्याद दिली आहे.
हिंडलगा कारागृह नेहमी या-ना त्या कारणावरून चर्चेत असते. अलिकडेच कारागृहात मोबाईल आणि गांजा फेकणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. राज्यातील विविध कारागृहांमध्ये बेकायदा प्रकार घडत असल्याने ही बाब कारागृह विभागाचे पोलीस महासंचालक अलोककुमार यांनी गांभीर्याने घेतली आहे. कारागृहातील बेकायदा घडामोडींवर अधिकाऱ्यांनी अंकुश ठेवावा, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला असल्याने हिंडलगा कारागृहात अधिकाऱ्यांकडून सातत्याने विविध बराकींमध्ये अचानक तपासणी केली जात आहे.
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाचे मुख्य प्रभारी अधीक्षक व्ही. कृष्णमूर्ती यांच्या नेतृत्त्वाखाली कारागृह अधिकाऱ्यांनी सर्कल नंबर 2 मधील बराक क्रमांक 8 आणि 9 ची शुक्रवार दि. 6 रोजी अचानक तपासणी केली. त्यावेळी बराक नं. 8 मधील कचऱ्याच्या बुट्टीत एक लावा ए वन जोश 2024 एलएफ 1001 ब्लू सिल्व्हर मोबाईल आणि सर्कल 2 मधील बराक नंबर 9 मधील खिडकीच्या आतील भिंतीत लावा ए वन जोश 2024 एलएफ 1001 ब्लॅक गोल्ड मोबाईल आणि एअर टेल कंपनीचे सीमकार्ड आढळून आले. ते सीमकार्ड जप्त करण्यात आले आहे.
Home महत्वाची बातमी हिंडलगा कारागृहात पुन्हा दोन मोबाईल-एक सीमकार्ड जप्त
हिंडलगा कारागृहात पुन्हा दोन मोबाईल-एक सीमकार्ड जप्त
अधिकाऱ्यांकडून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल प्रतिनिधी/ बेळगाव हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील दोन बराकीमध्ये दोन मोबाईल आणि एक एअरटेल कंपनीचे सीम आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकरणी कारागृह अधिकारी बसवराज वाय. बजंत्री यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञाताविरोधात फिर्याद दिली आहे. हिंडलगा कारागृह नेहमी या-ना त्या कारणावरून चर्चेत असते. अलिकडेच कारागृहात मोबाईल आणि गांजा फेकणाऱ्या […]
