पाण्याच्या टाकीत पडून दोन चिमुकल्या भावांचा मृत्यू
मुंबईत महापालिकेच्या उघड्या पाण्याच्या टाकीत पडून वय वर्ष सहा आणि वय वर्ष चार असलेल्या दोन चिमुकल्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना माटुंगा येथील जोसेफ हायस्कुलच्या मागे कर्वे उद्यानात घडली आहे. ही दोघे भावंडं रविवारपासून बेपत्ता होती. त्यांचे मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळून आले.
मिळालेल्या माहितीनुसार, महर्षी कर्वे उद्यानात पालिकेची पाण्याची टाकी उघडी असून प्लॅस्टिकने झाकलेली होती. उद्यानांत खेळायला गेलेले हे दोघे निरागस भाऊ या टाकीत जाऊन पडले. हे दोघे रविवारपासून बेपत्ता होते. बराच वेळ झाला तरीही दोघे सापडले नाही म्हणून कुटुंबीय त्यांचा शोधात होते. सोमवारी त्यांचा मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळला.
दोन्ही मुलांचे मृतदेह पाहून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या अपघातामुळे मुंबई पालिकेचा हलगर्जीपणा समोर आला आहे. मुंबई पालिकेचा हलगर्जीपणा दोन्ही मुलांच्या जीवावर बेतला असून चिमुकल्यांच्या मृत्यूमुळे नागरिकांचा संताप होत आहे.
Edited by – Priya Dixit