कणबर्गी तपासनाक्यावर दोन लाखाची रोकड जप्त
बेळगाव : कणबर्गी तपासनाक्यावर कार अडवून दोन लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. निवडणूक विभागाचे अधिकारी व पोलिसांनी सोमवारी सकाळी ही कारवाई केली. केए 22 एमए 7731 क्रमांकाची मुचंडीहून बेळगावला येणारी कार कणबर्गीजवळ अडवून तपासणी केली असता कारमध्ये दोन लाख रुपये आढळले. या कारमधून मच्छिंद्र विठ्ठल शिंदे, रा. मारोळी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर हे प्रवास करीत होते. अधिकाऱ्यांनी ही रक्कम जप्त केली आहे. रोकड वाहतुकीसंबंधी आवश्यक कागदपत्रे नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Home महत्वाची बातमी कणबर्गी तपासनाक्यावर दोन लाखाची रोकड जप्त
कणबर्गी तपासनाक्यावर दोन लाखाची रोकड जप्त
बेळगाव : कणबर्गी तपासनाक्यावर कार अडवून दोन लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. निवडणूक विभागाचे अधिकारी व पोलिसांनी सोमवारी सकाळी ही कारवाई केली. केए 22 एमए 7731 क्रमांकाची मुचंडीहून बेळगावला येणारी कार कणबर्गीजवळ अडवून तपासणी केली असता कारमध्ये दोन लाख रुपये आढळले. या कारमधून मच्छिंद्र विठ्ठल शिंदे, रा. मारोळी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर हे प्रवास […]
