रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या 2 मजुरांचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू

Bihar News : बिहारमधील खगरिया जिल्ह्यात शुक्रवारी बरौनी-कटिहार रेल्वे सेक्शनच्या गौचरी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेच्या धडकेने दोन मजुरांचा मृत्यू झाला असून तर दुसरा जखमी झाला आहे अशी माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौचरी हॉल्टजवळ मजूर रुळांवर काम करत होते. यावेळी लोहित एक्स्प्रेस गाडीने तीन मजुरांना धडक दिली. या घटनेत रेल्वेच्या धडकेत दोन मजुरांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. तसेच  मुकेश कुमार आणि अर्जुन शर्मा अशी मृतांची नावे असून ते जिल्ह्यातील पसराहा पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे. जखमी मजुराला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. 

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source