राजमा पासून बनवा दोन स्वादिष्ट रेसिपी
1.राजमा कटलेट
साहित्य-
1 कप वाफवलेला राजमा
1/2 कप उकडलेले बटाटे
1/2 कप ब्रेड क्रम्ब्स
1 कांदा बारीक चिरलेला
1 हिरवी मिरची बारीक तुकडे केलेली
1/2 चमचा धणे पूड
1/2 चमचा चाट मसाला
चवीनुसार मीठ
1 चमचा कसूरी मेथी
तळण्यासाठी तेल
कृती-
सर्वात आधी उकडलेला राजमा आणि बटाटा चांगल्या प्रकारे मॅश करून घ्यावा. आताएका बाऊलमध्ये चिरलेला कांदा, हिरवी मिरची, धणे पूड, चाट मसाला आणि मीठ घालून मिक्स करावे. आता हा तयार मसाला राजमा आणि बटाटा मध्ये घालावा. आता हे मिक्स करून त्याचे कटलेट बनवून घ्यावे. आता या कटलेटला ब्रेड क्रम्ब्समध्ये गुंडाळावे. आता तव्यावर तेल घालून त्यामध्ये हे कटलेट फ्राय करून घ्यावे. तर चला तयार आहे आपले गरम राजमा कटलेट, हिरव्या चटणीसोबत नक्कीच सर्व्ह करा.
2.राजमा राइस
साहित्य-
1 कप वाफवलेला राजमा
2 कप शिजवलेला भात
1 चमचे जिरे
1 चमचा हळद
1 चमचा तिखट
1/2 चमचा धणे पूड
चवीनुसार मीठ
1 चमचा तूप
कोथिंबीर
कृती-
रात्रभर राजमा भिजत घातल्यानंतर त्याला वाफवून घ्यावे.आता एका कढईमध्ये तूप घालावे. आता त्यामध्ये जिरे घालावे.मग त्यामध्ये हळद, तिखट आणि धणे पूड घालावी. आता हे परतवून घ्यावे. तसेच यामध्ये राजमा घालावा. व भात घालावा. हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करावे. तसेच मीठ घालून दहा मिनिट शिजवावे. आता वरून हिरवी कोथिंबीर गार्निश करावी. तर चला तयार आहे आपली राजमा राईस रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik