ज्येष्ठ अर्थतज्ञ चन्द्रशेखर टिळक यांची दोन दिवसांची व्याख्यानमाला

ज्येष्ठ अर्थतज्ञ चन्द्रशेखर टिळक यांची दोन दिवसांची व्याख्यानमाला

मुक्त संवाद साहित्यिक समिती व मध्य प्रदेश मराठी साहित्य मंच संघ ह्यांच्या संयुक्त तत्वावधनात दोन दिवसाची व्याख्यानमाला आयोजित केली जात आहे. दिनांक 28 व 29 मार्च रोजी ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि प्रसिद्ध वक्ता व लेखक श्री चंद्रशेखर टिळक यांची व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात येत आहे.

 

28 मार्च 2024 गुरुवार रोजी श्री नरेन्द्र फणसे यांच्या अध्यक्षतेखाली समर्थ रामदास आणि अर्थकारण या विषयावर श्री चन्दशेखर टिळक यांचे व्याख्यान होणार असून दिनांक 29 मार्च 2024 शुक्रवार रोजी श्री शिरिष पुरंदरे यांच्या अध्यक्षतेखाली गुंतवणुकीतुन आर्थिक सुबत्ता या विषयावर व्याख्यान आयोजित केले गेले आहे.

 

इंदूर येथील महात्मा गांधी मार्गावर स्थित प्रितमलाल दुआ सभागृहात सायंकाळी 6.30 मिनिटापासून कार्यक्रमास सुरुवात होईल.

 

श्री चंद्रशेखर टिळक हे एकूण 40 वर्षांपासून वित्तीय सेवा क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांनी हर्षद मेहता आणि केतन पारेख सारख्या गाजलेल्या आर्थिक घोटाळ्यात तपासणी आधिकरी म्हणून कार्य केले आहे. श्री टिळक यांनी आजपर्यंत देश- विदेशात मिळून सुमारे 4700 व्याख्याने दिली आहे तर आजपर्यंत त्यांचे 3800 लेख आणि 32 पुस्तके ( एकूण 78 आवृत्त्या ) प्रकाशित झाल्या आहेत.