दोन सीआरपीएफ जवान मणिपूरमध्ये हुतात्मा
कुकी दहशतवाद्यांकडून बॉम्बफेक, अन्य 2 जवान जखमी
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमधील नारनसेना भागात कथित कुकी समुदायाने शुक्रवारी मध्यरात्री केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) दोन जवान हुतात्मा झाले आहेत. तसेच अन्य दोघे जवान जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे जवान राज्यातील विष्णुपूर जिल्ह्यातील नारनसेना भागात तैनात सीआरपीएफच्या 128 व्या बटालियनचे आहेत. मणिपूर पोलिसांनी या हल्ल्याची माहिती दिली असून मध्यरात्री हा हल्ला झाल्याचे सांगितले. मणिपूरमध्ये शुक्रवारी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान संपल्यानंतर काही तासांनी हा हल्ला झाला.
कुकी समुदायाच्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या चौकीला लक्ष्य करत डोंगराच्या माथ्यावरून अंदाधुंद गोळीबार केला. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला गोळीबार रात्री अडीच वाजेपर्यंत सुरू होता. या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी बॉम्बदेखील फेकले. यापैकी एक स्फोट सीआरपीएफच्या 128 बटालियनच्या पोस्टमध्ये झाल्यामुळे दोघांना हौतात्म्य पत्करावे लागले. या हल्ल्यात सहभागी असलेल्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या स्फोटात जखमी झालेल्यांना तात्काळ ऊग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. इतर दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
Home महत्वाची बातमी दोन सीआरपीएफ जवान मणिपूरमध्ये हुतात्मा
दोन सीआरपीएफ जवान मणिपूरमध्ये हुतात्मा
कुकी दहशतवाद्यांकडून बॉम्बफेक, अन्य 2 जवान जखमी वृत्तसंस्था/ इंफाळ मणिपूरमधील नारनसेना भागात कथित कुकी समुदायाने शुक्रवारी मध्यरात्री केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) दोन जवान हुतात्मा झाले आहेत. तसेच अन्य दोघे जवान जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे जवान राज्यातील विष्णुपूर जिल्ह्यातील नारनसेना भागात तैनात सीआरपीएफच्या 128 व्या बटालियनचे आहेत. मणिपूर पोलिसांनी […]
