मुंबई मध्ये दोन लहान मुलांचा मृत्यू

मुंबई मध्ये खेळतांना दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कुटुंबीयांनी मुलांना शोधले पण ते कुठेच आढळले नाही. पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी लहान मुलांचा शोध सुरु केला असता. पोलिसांना दोन अहं मुलांचा मृतदेह अनेक …

मुंबई मध्ये दोन लहान मुलांचा मृत्यू

Munbai : मुंबई मध्ये खेळतांना दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कुटुंबीयांनी मुलांना शोधले पण ते कुठेच आढळले नाही. पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी लहान मुलांचा शोध सुरु केला असता. पोलिसांना दोन अहं मुलांचा मृतदेह अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या जुन्या कारमध्ये आढळला. 

 

मिळलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या एनटॉप हिल परिसरात खूप वर्षापासून पडीत असलेल्या जुन्या कार मध्ये दोन लहान मुलांचा मृतदेह आढळला आहे. हे दोघे लहान मुलं बुधवार पासून दुपारी अडीच वाजेपासून बेपत्ता होते. एक मुलगा 5 वर्षाचा आहे तर दुसरा 7 वर्षाचा असून हे अचानक खेळता खेळता बेपत्ता झालेत. कुटुंबीयांनी मुले दिसत नाही म्हणून शोध सुरु केला. पण त्यांना ते परिसरात कुठेच सापडले नाही. अखेरीस त्यांनी पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी शोध घेतल्या नंतर त्यांना एका जुन्या पडीत कार मध्ये या चिमुकल्यांचा मृतदेह आढळला. मुलांचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी आणि परिसरातील लोकांनी खूप आक्रोश केला. 

 

ही कार एका डीलरची असून, ती काही वर्षांपासून त्या परिसरामध्ये पडीत होती. कार जुनी असल्यामुळे तिचे दरवाजे लॉक होऊन गेले होते मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी दोन तासांनी प्रयत्नांना यश आले. कार जुनी असल्यामुळे मुलांना दरवाजे कसे उघडता आले याचे आश्चर्य सर्वांना वाटत आहे. असा अंदाज लावण्यात आला आहे की, मुले खेळता खेळता कार मध्ये गेलेत. नंतर दरवाजे लॉक झाल्यामुळे त्यांना बाहेर येता आले नाही. व ऑक्सिजनची कमी झाल्यामुळे या दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सर्व परिसर शोधल्या नंतर त्यांचे लक्ष त्या कार कडे गेले. या कारच्या खिडक्यांच्या काचेवर धूळ जमा झाली होती. पोलिसांनी टॉर्चच्या मदतीने पहिले असता त्यांना मागच्या सीट वर मुलांचे मृतदेह दिसले. खूप प्रयत्नांनी पोलिसांना लॉक झालेले दरवाजे उघडण्यात यश आले. मुलांना तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टारांनी त्यांना मृत घोषित केले.

Edited By- Dhanashri Naik   

Go to Source