धामणेत समाजकंटकांकडून दोन दुचाकींना आग

बेळगाव : समाजकंटकांच्या उपद्रवामुळे धामणे, ता. बेळगाव गाव हादरले आहे. रात्री घरासमोर उभ्या केलेल्या दोन दुचाकी पेटविण्यात आल्या असून त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. सुनील बस्तवाडकर यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर दुचाकी पेटविण्याचा प्रकार उघडकीस आला असून स्थानिक नागरिकांनी पाणी मारून आग विझविली असली तरी […]

धामणेत समाजकंटकांकडून दोन दुचाकींना आग

बेळगाव : समाजकंटकांच्या उपद्रवामुळे धामणे, ता. बेळगाव गाव हादरले आहे. रात्री घरासमोर उभ्या केलेल्या दोन दुचाकी पेटविण्यात आल्या असून त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. सुनील बस्तवाडकर यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर दुचाकी पेटविण्याचा प्रकार उघडकीस आला असून स्थानिक नागरिकांनी पाणी मारून आग विझविली असली तरी आगीत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. हे कृत्य कोणी केले, याचा उलगडा झाला नाही. गुरुवारी रात्री 11 ते मध्यरात्री 1 या वेळेत ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. घरासमोर उभी करण्यात आलेली होंडा अॅक्टिव्हा व स्प्लेंडर प्रो या दोन वाहनांना आग लावण्यात आली आहे. वाहने पेटविणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ पुढील तपास करीत आहेत.