पणजीतील पे पार्किंगमधून दोन भाग वगळणार : महापौर
पणजी : राजधानी पणजीतील सांतईनेज भागात असलेल्या स्मशानभूमी आणि दफनभूमीचा भाग ‘पे पार्किंग’ मधून वगळण्यात येणार आहे. निविदा जारी करताना ते दोन्ही विभाग त्यातून काढून टाकण्यात येतील आणि तेथे वाहनांचे पार्किंग मोफत ठेवण्यात येईल, अशी माहिती महापौर रोहीत मोन्सेरात यांनी दिली आहे. मोन्सेरात यांनी पुढे सांगितले की, नवीन ठिकाणी पे पार्किंग सुरू करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागणार असून निविदा प्रक्रिया आणि इतर बाबी पूर्ण होण्यासाठी सदर कालावधी आवश्यक आहे. निविदा खुली करण्यासाठीच दोन, तीन आठवडे लागतील शिवाय ज्याला कंत्राट मिळेल त्याला ते सुरू करण्यासाठी पुन्हा कालावधी लागणार असल्याने एकूण चार महिने तरी त्यासाठी जातील, असा अंदाज मोन्सेरात यांनी व्यक्त केला आहे. सांतईनेज येथील स्मशानभूमी व दफनभूमीचा विभाग पे पार्किंगमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे आणि तशी अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढली आहे. तेथील विभाग वगळावेत आणि ते पे पार्किंगमध्ये समाविष्ट करू नयेत अशी लोकांची मागणी पुढे आल्यामुळे त्याची दखल घेऊन ते वगळण्यात येणार असल्याचे मोन्सेरात यांनी नमूद केले.
Home महत्वाची बातमी पणजीतील पे पार्किंगमधून दोन भाग वगळणार : महापौर
पणजीतील पे पार्किंगमधून दोन भाग वगळणार : महापौर
पणजी : राजधानी पणजीतील सांतईनेज भागात असलेल्या स्मशानभूमी आणि दफनभूमीचा भाग ‘पे पार्किंग’ मधून वगळण्यात येणार आहे. निविदा जारी करताना ते दोन्ही विभाग त्यातून काढून टाकण्यात येतील आणि तेथे वाहनांचे पार्किंग मोफत ठेवण्यात येईल, अशी माहिती महापौर रोहीत मोन्सेरात यांनी दिली आहे. मोन्सेरात यांनी पुढे सांगितले की, नवीन ठिकाणी पे पार्किंग सुरू करण्यासाठी चार महिन्यांचा […]