बारा सदस्यांचा भारतीय नेमबाजी संघ जाहीर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डोहा येथे 19 ते 29 एप्रिल दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठीच्या अंतिम पात्र फेरी शॉटगन नेमबाजी स्पर्धेसाठी भारताचा 12 सदस्यांचा संघ जाहीर करण्यात आला.
निवडण्यात आलेल्या 12 नेमबाजांमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती श्रेयसी सिंग, मैराज अहमद खान, विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील विजेती गनेमत सेखाँ यांचा समावेश आहे. अखिल भारतीय रायफल संघटनेने आगामी ऑलिम्पिकसाठीच्या विविध महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी नेमबाजांची निवड केली आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा जुलै-ऑगस्ट दरम्यान होणार आहे. यामध्ये कोटा पद्धतीनुसार 4 जागा भरल्या जाणार आहेत. पुरूष आणि महिलांच्या रॅप आणि स्किट या नेमबाजी प्रकारामध्ये प्रत्येकी 1 जागा डोहा स्पर्धेतून निश्चित होईल. पुरूषांच्या ट्रॅप नेमबाजीसाठी पृथ्वीराज तोंडाईमन आणि विवान कपूर तसेच महिलांच्या ट्रॅप नेमबाजीसाठी श्रेयसी सिंग आणि मनीषा किर, पुरूषांच्या स्किट नेमबाजी प्रकारासाठी मिराझ अहमद खान आणि सिराज शेख महिलांच्या स्किट नेमबाजी प्रकारासाठी गनेमत सेखाँ आणि माहेश्वरी चौहान यांची निवड करण्यात आली आहे. डोहामध्ये होणाऱ्या या पात्र फेरीच्या स्पर्धेत पुरूषांच्या ट्रॅप नेमबाजीसाठी जोरावर संधूचे तसेच महिलांच्या ट्रॅप नेमबाजीसाठी नीरुची, पुरूषांच्या स्किट प्रकारात अंगद बजवा तर महिलांच्या स्किट प्रकारात आरिबा खानची निवड करण्यात आली आहे.
पॅरिस ऑलिम्पिकसाठी आता पात्र फेरीच्या तीन स्पर्धा येत्या काही दिवसांमध्ये घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये इटलीतील युब्रिया येथे ग्रीन कप शॉटगन स्पर्धा, अझरबैजानमधील बाकू येथे मे महिन्यात आयएसएसएफची संयुक्त विश्वचषक नेमबाजी स्पर्धा आणि इटलीतील लोनेटो येथे जून महिन्यात विश्वचषक शॉटगन स्पर्धा यांचा समावेश आहे. पुरूषांच्या ट्रॅपमध्ये कोटा पद्धतीसाठी भुवनीश मेंडीरट्टा, महिलांच्या ट्रॅपमध्ये राजेश्वरी कुमारी, पुरूषांच्या स्किटमध्ये अनंतजीतसिंग नरुका, महिलांच्या स्किटमध्ये रायझा धिल्लाँ यांचा भारतीय संघात समावेश आहे. सध्या ऑलिम्पिक शॉटगन स्पर्धेसाठीच्या संभाव्य नेमबाजांसाठी दिल्लीमध्ये तांत्रिक सराव शिबिर सुरु आहे. यानंतर ट्रॅप आणि स्किट नेमबाजी प्रकारासाठी निवडण्यात आलेल्या संघांसाठी पूर्व तयारीचे शिबिर घेतले जाणार आहे. या शिबिरानंतर भारतयी नेमबाज संघ डोहाला प्रयाण करतील. पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताच्या 19 नेमबाजांनी कोटा पद्धतीनुसार आपले स्थान निश्चित केले आहे. तसेच शॉटगन नेमबाजी प्रकारासाठी भारताच्या 4 नेमबाजांनी आपली पात्रता सिद्ध केली आहे.
Home महत्वाची बातमी बारा सदस्यांचा भारतीय नेमबाजी संघ जाहीर
बारा सदस्यांचा भारतीय नेमबाजी संघ जाहीर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली डोहा येथे 19 ते 29 एप्रिल दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठीच्या अंतिम पात्र फेरी शॉटगन नेमबाजी स्पर्धेसाठी भारताचा 12 सदस्यांचा संघ जाहीर करण्यात आला. निवडण्यात आलेल्या 12 नेमबाजांमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती श्रेयसी सिंग, मैराज अहमद खान, विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील विजेती गनेमत सेखाँ यांचा समावेश आहे. अखिल भारतीय रायफल संघटनेने आगामी ऑलिम्पिकसाठीच्या […]