Satara News : साताऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी गढूळ व दूषित पाण्याचा पुरवठा

                                         साताऱ्यात पाण्यात माती, गाळ व दुर्गंधी; सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरात सलग दुसऱ्या दिवशी गढूळ व दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नळाद्वारे येणारे पाणी पिण्यायोग्य नसून […]

Satara News : साताऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी गढूळ व दूषित पाण्याचा पुरवठा

                                         साताऱ्यात पाण्यात माती, गाळ व दुर्गंधी;

सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरात सलग दुसऱ्या दिवशी गढूळ व दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नळाद्वारे येणारे पाणी पिण्यायोग्य नसून त्यामध्ये माती, गाळ व दुर्गंधी आढळून येत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.
पाणी पुरवठ्याच्या या हलगर्जीपणामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व्यक्तीना आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक भागांमध्ये नागरिकांनी पाणी वापरणे टाळले असून पिण्याच्या पाण्यासाठी खासगी टैंकर किंवा बाटलीबंद पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे संबंधित अधिकारी व पाणीपुरवठा ठेकेदार सुस्तावलेल्या अवस्थेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पाणी शुद्धीकरण केंद्रांची तपासणी, पाइपलाईनची साफसफाई तसेच तात्काळ स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन दोषी अधिकारी व ठेकेदारांबर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिक व सामाजिक संघटनांकडून देण्यात आला आहे.