हलग्यानजीक शेणखतवाहू ट्रक उलटला

बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हलगाजवळ शेणखत घेऊन हिरेबागेवाडीकडे जाणारा ट्रक उलटला. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा पोहोचली नाही. सोमवारी सायंकाळपर्यंत अपघातग्रस्त ट्रक सर्व्हिस रोडवर पडून होता. शेणखतही विखुरलेले होते. सायंकाळी ट्रक व शेणखत बाजूला काढण्यात आले. यासंबंधी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता एफआयआर दाखल झाला नसल्याचे […]

हलग्यानजीक शेणखतवाहू ट्रक उलटला

बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हलगाजवळ शेणखत घेऊन हिरेबागेवाडीकडे जाणारा ट्रक उलटला. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा पोहोचली नाही. सोमवारी सायंकाळपर्यंत अपघातग्रस्त ट्रक सर्व्हिस रोडवर पडून होता. शेणखतही विखुरलेले होते. सायंकाळी ट्रक व शेणखत बाजूला काढण्यात आले. यासंबंधी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता एफआयआर दाखल झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.