Solapur News : उत्तर प्रदेशातील ट्रक चालकाचा सोलापूरमध्ये दुर्दैवी मृत्यू

                                   श्वास घेण्यास त्रास होऊन ट्रक चालकाचा मृत्यू सोलापूर : मुंब्रा ते हैद्राबाद असे टँकर ट्रक घेऊन जात असताना श्वास घेण्यास त्रास होऊन ट्रक चालकाचा मृत्यू झाला. हा प्रकार शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडला. हा ट्रक चालक उत्तर प्रदेशातील […]

Solapur News : उत्तर प्रदेशातील ट्रक चालकाचा सोलापूरमध्ये दुर्दैवी मृत्यू

                                   श्वास घेण्यास त्रास होऊन ट्रक चालकाचा मृत्यू
सोलापूर : मुंब्रा ते हैद्राबाद असे टँकर ट्रक घेऊन जात असताना श्वास घेण्यास त्रास होऊन ट्रक चालकाचा मृत्यू झाला. हा प्रकार शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडला. हा ट्रक चालक उत्तर प्रदेशातील दुधारा भागातील संत कबिर नगर येथे राहणारा आहे.
मोहम्मद उस्मान (वय २५) असे ट्रक चालकाचे नाव आहे. मोहम्मद हा मुंब्रा येथून हैद्राबादच्या दिशेने ट्रक चालवित जात होता. शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास त्यास जळकोटजवळ असताना, श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यात त्याला उलटीचा त्रासही झाला. जळकोट येथील रुग्णालयात उपचार करून शनिवारी रात्री एकच्या सुमारास त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले.
परंतु उपचारापूर्वीच तो मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.