ट्रकचालकावर चाकू हल्ला
क्लब रोडवरील घटनेने तणावाची स्थिती
बेळगाव : ट्रकचालकाला अडवून त्याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला. मंगळवारी रात्री क्लब रोडवर ही घटना घडली असून कॅम्प पोलीस स्थानकात अज्ञाताविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. दगड व विटांचा मारा करून ट्रकच्या काचाही फोडण्यात आल्या आहेत. अयाज अकबर सवनूर (वय 38) राहणार रुक्मिणीनगर असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. घटनेची माहिती समजताच कॅम्पचे पोलीस निरीक्षक आनंद वणकुद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. उपलब्ध माहितीनुसार केए 22 डी 2639 क्रमांकाच्या ट्रकमधून गुजरातहून लोखंड आणण्यात आले होते. शिनोळीला ते उतरवून बेळगावला परतताना हिंडलगाजवळ एका वाहनाला ट्रक घासून गेली. त्यावेळी तेथील काही तरुणांनी ट्रकचा पाठलाग सुरू केला. पाठलाग करणाऱ्यांना चुकविण्यासाठी ट्रक पळवताना क्लब रोड परिसरातही ट्रक एका कारला घासून गेली. त्यावेळी ट्रकवर दगडफेक करून काही तरुणांनी चालकावर चाकू हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
Home महत्वाची बातमी ट्रकचालकावर चाकू हल्ला
ट्रकचालकावर चाकू हल्ला
क्लब रोडवरील घटनेने तणावाची स्थिती बेळगाव : ट्रकचालकाला अडवून त्याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला. मंगळवारी रात्री क्लब रोडवर ही घटना घडली असून कॅम्प पोलीस स्थानकात अज्ञाताविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. दगड व विटांचा मारा करून ट्रकच्या काचाही फोडण्यात आल्या आहेत. अयाज अकबर सवनूर (वय 38) राहणार रुक्मिणीनगर असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार […]

