जांभूळवाडी पुला जवळ ट्रकचा अपघात, क्लिनर व चालकाचा मृत्यू

मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास कात्रज घाट परिसरात जांभूळवाडी पुलाजवळ महामार्गावर ट्रक आणि बसचा अपघात होऊन ट्रक चालकाचा मृत्यू झाला तर बस मधील काही प्रवासी जखमी झाले.

जांभूळवाडी पुला जवळ ट्रकचा अपघात, क्लिनर व चालकाचा मृत्यू

मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास कात्रज घाट परिसरात जांभूळवाडी पुलाजवळ महामार्गावर ट्रक आणि बसचा अपघात होऊन ट्रक चालकाचा मृत्यू झाला तर बस मधील काही प्रवासी जखमी झाले. 

ALSO READ: महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन: भ्रष्टाचाराबद्दल महाविकास आघाडीने मंत्री नरहरी झिरवाल यांचा राजीनामा मागितला

सदर अपघात मंगळवारी पहाटे कात्रज नवीन बोगद्याकडून नवले ब्रिजकडे येणाऱ्या मार्गावर जांभूळवाडी दरी पुलाजवळ लोखण्डी सळ्या आणि पाईप घेऊन जाणाऱ्या ट्रक ने बसला लागून धडक दिली आणि अपघात झाला. धडक इतकी भीषण होती किया ट्रकचा पुढील भागाचा चुराडा झाला.

या अपघातात बस मधील तीन ते चार जण जखमी झाले तर ट्रक चालक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले उपचाराधीन असता त्याचा मृत्यू झाला. तर बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले .त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. 

ALSO READ: राज्य सरकार देशातील पहिले ‘इंडस्ट्रियल एआय धोरण’ राज्यातील औद्योगिक क्षेत्रांत लागू करणार

अपघातानंतर ट्रकचा क्लीनर केबिनमध्ये आणि लोखंडी सळ्यांमध्ये अडकला ज्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झाला. अग्निशमन दलाने कटरच्या सहाय्याने केबिन कापून त्याला बाहेर काढले. त्यालाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलिसांचा तपास सुरु आहे.

ALSO READ: पुण्यात आईच्या मित्राकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पथक तात्काळ दाखल झाले होते. अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. 

Edited By – Priya Dixit

 

Go to Source