कुपेरी घाटीत ट्रकचा भीषण अपघात

ट्रकचा चक्काचूर ; चालक , क्लीनर बालबाल बचावले चौके/वार्ताहर शुक्रवार दिनांक २९ रोजी रात्री 9.15 वाजता मालवण-कसाल मार्गांवरील कुणकावळे येथील कुपेरी घाटीत चौके ते बेळगाव अशी चिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी होत भीषण अपघात झाला.या अपघातात केवळ दैव बलवत्तर म्हणून चालक व क्लीनर सुदैवाने बालबाल बचावले. तसेच या मार्गावरून कट्टा ते मालवण असा दुचाकीने प्रवास […]

कुपेरी घाटीत ट्रकचा भीषण अपघात

ट्रकचा चक्काचूर ; चालक , क्लीनर बालबाल बचावले
चौके/वार्ताहर
शुक्रवार दिनांक २९ रोजी रात्री 9.15 वाजता मालवण-कसाल मार्गांवरील कुणकावळे येथील कुपेरी घाटीत चौके ते बेळगाव अशी चिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी होत भीषण अपघात झाला.या अपघातात केवळ दैव बलवत्तर म्हणून चालक व क्लीनर सुदैवाने बालबाल बचावले. तसेच या मार्गावरून कट्टा ते मालवण असा दुचाकीने प्रवास करणारे पोलीस कर्मचारी यांच्या दुचाकीसमोरच अपघात घडल्याने तेही बचावले. मात्र या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.याबाबत सविस्तर असे की सदर ट्रक (KA-31-7165)हा नेहमीप्रमाणे चौके ते बेळगाव अशी चिरे वाहतूक करायचा. शुक्रवारी रात्री नऊ वाजता चिरे भरून चौकेतून निघालेला ट्रक कुपेरी घाटी उतरत असताना अचानक ट्रक मध्ये बिघाड झाल्याने ट्रक रस्त्यावरच पलटी झाला. हा अपघात दूचाकीने मालवण येथे जाणारे कट्टा दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी चीपकर यांच्या अगदी समोरच घडला.
दैव बलवत्तर आणि पोलीस रूपाने आले देवदूत
एवढा मोठा भीषण अपघात होऊनही ट्रक मधील चालक- क्लिनर तसेच अपघाताच्या स्थळी समोरच दुचाकीवर असलेले पोलीस कर्मचारी सिद्धेश चिपकर यांचे दैव बलवत्तर म्हणून कोणतीही दुखापत न होता सुखरूप बचावले.चिपकर यांना क्षणात काही कळलेच नाही. तरीही त्याच परिस्थितीत त्यांनी अपघातातील चालक व क्लीनर यांना सुखरूप बाहेर काढून धीर देत बाजूला बसवले. अजून थोडा जरी वेळ आतमध्ये अडकले असते तर त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असता मात्र पोलीस कर्मचारी चिपकर हे देवदूता सारखे धावले आणि त्यांचे प्राण वाचवले.
अपघाताची बातमी समजतात कुणकावळे -चौके -साळेल येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत अपघातग्रस ट्रक जेसीबीच्या साह्याने रस्त्यावरुन बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.यावेळी कुणकावळे सरपंच मंदार वराडकर, सामाजिक कार्यकर्ते पप्पू वराडकर, चौक येथील चिरेकर व्यावसायिक बिजेंद्र गावडे, संतोष गावडे,मोहन गावडे यांच्यासह कुणकावळे चौके साळेल येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी मदत कार्यात सहभाग घेतला अपघातात तसे पूर्णतः नुकसान झाले आहे .