त्रिपुरा मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर

वृत्तसंस्था / नवी दिल्ली त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सहा यांनी शुक्रवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी राज्यातील परिस्थितीसंबंधी चर्चा केली आहे. ते दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आले आहेत. दोन दिवसांपूर्वी मणिपूरचे मुख्यमंत्रीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करुन गेले आहेत. ईशान्य भारतात भारतीय जनता पक्षाची चार राज्यांमध्ये सरकारे आहेत. तेथील मुख्यमंत्र्यांशी केंद्रीय पातळीवरुन चर्चा करुन […]

त्रिपुरा मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर

वृत्तसंस्था / नवी दिल्ली
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सहा यांनी शुक्रवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी राज्यातील परिस्थितीसंबंधी चर्चा केली आहे. ते दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आले आहेत. दोन दिवसांपूर्वी मणिपूरचे मुख्यमंत्रीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करुन गेले आहेत. ईशान्य भारतात भारतीय जनता पक्षाची चार राज्यांमध्ये सरकारे आहेत. तेथील मुख्यमंत्र्यांशी केंद्रीय पातळीवरुन चर्चा करुन त्या राज्यांमधील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
केंद्र सरकारच्या पुढाकाराने त्रिपुरात अनेक विकास कामे केली जात आहेत. तसेच पायाभूत सुविधा प्रकल्पही हाती घेण्यात आले आहेत. या सर्व कामांच्या प्रगतीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली. त्यांनीही काही महत्वाच्या सूचना करुन सर्व प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासंबंधी आवाहन केले, अशी माहिती सहा यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना दिली. त्रिपुरातील बेलोनिया येथून बांगला देशमध्ये जाणाऱ्या रेल्वे प्रकल्पाची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली आहे, असेही सहा यांनी आपल्या संदेशात स्पष्ट केले आहे.