तनिष्का काळभैरवला तिहेरी मुकूट

बेंगळूर, म्हैसूर, मंगळूर मानांकित स्पर्धेत तिहेरी यश बेळगाव : कर्नाटक राज्य टेबल टेनिस संघटना आयोजित बेंगळूर, म्हैसूर व मंगळूर येथे  झालेल्या राज्यस्तरीय मानांकित (रॅकिंग) टे. टे. स्पर्धेत बेळगावची संगमबैलूर बॅटमिंटन अकादमीची अग्रमानांकित तनिष्का काळभैरवने 13, 15 व 17 या तिन्ही गटात व तिन्ही स्पर्धेतून आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन तिहेरी मुकूट पटकावित घवघवीत यश संपादन करुन बेळगावचे नाव संपूर्ण राज्यात टे.टे.मध्ये […]

तनिष्का काळभैरवला तिहेरी मुकूट

बेंगळूर, म्हैसूर, मंगळूर मानांकित स्पर्धेत तिहेरी यश
बेळगाव : कर्नाटक राज्य टेबल टेनिस संघटना आयोजित बेंगळूर, म्हैसूर व मंगळूर येथे  झालेल्या राज्यस्तरीय मानांकित (रॅकिंग) टे. टे. स्पर्धेत बेळगावची संगमबैलूर बॅटमिंटन अकादमीची अग्रमानांकित तनिष्का काळभैरवने 13, 15 व 17 या तिन्ही गटात व तिन्ही स्पर्धेतून आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन तिहेरी मुकूट पटकावित घवघवीत यश संपादन करुन बेळगावचे नाव संपूर्ण राज्यात टे.टे.मध्ये उज्वल केले आहे.
लहान वयात तिन्ही गटामध्ये तिन्ही स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकविणारी तनिष्का काळभैरव ही संपूर्ण कर्नाटकातून पहिली टे.टे.पटू आहे. म्हैसूर येथे म्हैसूर जिल्हा टेबल टेनिस संघटना आयोजित राज्य स्तरीय रॅकिंग टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये 13 वर्षाखालील गटात काळभैरवने उपांत्य फेरीत अग्रमानांकित साक्षा संतोषचा 12-10, 11-2, 11-6 असा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात तनिष्काने मिहीका उदुपाचा 11-1, 11-7, 11-1 अशा सरळ सेटसमध्ये पराभव करुन विजेतेपद पटकाविले.
15 वर्षांखालील गटात तनिष्काने उपांत्यफेरीत कायरा बालिगाचा 11-6, 11-8, 11-2 अशा सेटसमध्ये पराभव करुन अंतिम फेरीत धडक मागली. अतिम सामन्यात तनिष्काने हिया सिंगचा 10-12, 11-5, 11-7 व 11-9 अशा सेटसमध्ये पराभव करुन विजेतेपद पटकाविले.  17 वर्षांखालील गटात तनिष्काने प्रणवीचा उपांत्य फेरीत 11-6, 11-5, 10-12, 11-6 अशा सेटमध्ये पराभव करुन अंतिम फेरीत मजल मारली. अंतिम फेरीमध्ये अतिष्काने मानांकित हिमांशी चौधरीचा 11-4, 11-8, 11-9 अशा सेटसमध्ये पराभव करीत विजेतेपदासह तिहेरी मुकूट पटकाविले.
मंगळूर येथे झालेल्या रॅकिंग स्पर्धेत 13 वर्षांखालील गटात अंतिम सामन्यात तनिष्काने इरीनी सुभाषचा 11-1, 11-3, 11-1 अशा सेटमध्ये पराभव करुन विजेतेपद पटकाविले.  15 वर्षांखालील गटात अंतिम सामन्यात तनिष्काने हियासिनचा 11-13, 6-11, 11-9, 11-4, 11-5 अशा सेटमध्ये पराभव करुन विजेतेपद मिळविले. 17 वर्षांखालील गटात अंतिम सामन्यात तनिष्काने अर्णवीचा 11-5, 11-5, 11-4 अशा सेटसमध्ये पराभव करुन तिहेरी मुकूट पटकाविले.
बेंगळूर येथे झालेल्या मानांकित टे.टे. स्पर्धेत 13 वर्षांखालील गटात तनिष्का काळभैरवने साक्षा संतोषचा 12-10, 11-2, 11-3  तर 15 वर्षांखालील गटात अंतिम सामन्यात तनिष्काने हियासिंगचा 11-4, 11-6, 11-6 अशा सेटमध्ये पराभव केला. 17 वर्षांखालील गटात अंतिम सामन्यात तनिष्काने उच्चमानांकित हिमांशी चौधरीचा 11-9, 11-4,  6-11 व 11-9 अशा सेटमध्ये पराभव करुन तिहेरी मुकूट पटकाविले. या तिन्ही स्पर्धेत मान्यवरांच्या हस्ते तनिष्काला चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून त्याचा गौरव करण्यात आला. तीला टेबल टेनिस प्रशिक्षक संगम बैलूर यांचे मार्गदर्शन लाभत असून डी.पी. स्कूलच्या प्राचार्य रोशम्मा, आई सोनाली, वडील कपिल काळभैरव यांचे प्रोत्साहन लाभत आहे.