14 फेब्रुवारी पुलवामा शहिदांना आदरांजली!!

शहिदांची आठवण ठेवा, जाता जाता प्रेमाच्या गावा, विसर न आम्हा त्यांचा कदापी व्हावा,

14 फेब्रुवारी पुलवामा शहिदांना आदरांजली!!

शहिदांची आठवण ठेवा, जाता जाता प्रेमाच्या गावा,

विसर न आम्हा त्यांचा कदापी व्हावा, 

जाता जाता प्रेमाच्या गावा……!

स्मरणार्थ त्यांच्या ही एक तेवत ठेवा दिवा,

जाता जाता प्रेमाच्या गावा…..!

सुपुत्र होतें ते मातृभूमी चे,याचे भान ठेवा,

जाता जाता प्रेमाच्या गावा…!

फुल देता प्रियकराला, मान थोडा त्यांनाही द्यावा,

जाता जाता प्रेमाच्या गावा…!

कुठतरी, कधितरी पुलवामा ही आठवा,

जाता जाता प्रेमाच्या गावा..!

प्रेमळ मन तुमचे, त्यांचे ही बलीदान लक्षात ठेवा,

जाता जाता प्रेमाच्या गावा….!

…अश्विनी थत्ते

 

Go to Source