ट्रॅप’ चित्रपटाचा ट्रेलर जारी
मनोवैज्ञानिक-थ्रिलर धाटणीचा चित्रपट
वॉर्नर ब्रदर्सने एम. नाइट श्यामलन यांचा नवा मनोवैज्ञानिक थ्रिलरपट ‘ट्रॅप’चा ट्रेलर जारी केला आहे. या ट्रेलरला युट्यूबवर मोठा प्रतिसाद मिळत आहे. ट्रॅप या चित्रपटात जोश हार्टनेट, सालेका श्यामलन, हेले मिल्स आणि मार्नी मॅकफेल हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
ट्रॅप या चित्रपटात एक पिता आणि किशोरवयीन मुलीची कहाणी असून ते एका पॉप कॉन्सर्टमध्ये भाग घेत असल्याचे दाखविण्यात आले आहे. कॉन्सर्टमध्ये आपण एका काळोख्या आणि भयावह घटनेच्या केंद्रस्थानी असल्याची जाणीव त्यांना होते. चित्रपटाचा फर्स्ट लुक लास व्हेगासच्या सिनेमाकॉनमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.
ट्रॅप या चित्रपटात पॉपस्टारची भूमिका श्यामलन यांची कन्या सालेकाने साकारली आहे. सालेका एक गायिका आणि कवयित्री देखील आहे. सालेकाने चित्रपटासाठी अनेक गाणी लिहिली आहेत. हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Home महत्वाची बातमी ट्रॅप’ चित्रपटाचा ट्रेलर जारी
ट्रॅप’ चित्रपटाचा ट्रेलर जारी
मनोवैज्ञानिक-थ्रिलर धाटणीचा चित्रपट वॉर्नर ब्रदर्सने एम. नाइट श्यामलन यांचा नवा मनोवैज्ञानिक थ्रिलरपट ‘ट्रॅप’चा ट्रेलर जारी केला आहे. या ट्रेलरला युट्यूबवर मोठा प्रतिसाद मिळत आहे. ट्रॅप या चित्रपटात जोश हार्टनेट, सालेका श्यामलन, हेले मिल्स आणि मार्नी मॅकफेल हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ट्रॅप या चित्रपटात एक पिता आणि किशोरवयीन मुलीची कहाणी असून ते एका पॉप कॉन्सर्टमध्ये […]