परिवहनतर्फे चालक दिनानिमित्त बसचालकांचा सत्कार

बेळगाव : परिवहनच्या सार्वजनिक बस वाहतुकीत बसचालकांची भूमिका महत्त्वाची असते. प्रवाशांची सुरक्षितता आणि प्रवाशांना वेळेत इच्छितस्थळी पोहोचविणे हे काम बसचालकांचे असते. रस्ता सुरक्षा उपक्रमाचा भाग म्हणून 24 जानेवारी हा चालक दिन म्हणून साजरा केला जातो, अशी माहिती बेळगाव परिवहन विभागाचे विभागीय नियंत्रक गणेश राठोड यांनी दिली. नुकताच परिवहन मंडळातर्फे चालक दिन साजरा करण्यात आला. यावेळी […]

परिवहनतर्फे चालक दिनानिमित्त बसचालकांचा सत्कार

बेळगाव : परिवहनच्या सार्वजनिक बस वाहतुकीत बसचालकांची भूमिका महत्त्वाची असते. प्रवाशांची सुरक्षितता आणि प्रवाशांना वेळेत इच्छितस्थळी पोहोचविणे हे काम बसचालकांचे असते. रस्ता सुरक्षा उपक्रमाचा भाग म्हणून 24 जानेवारी हा चालक दिन म्हणून साजरा केला जातो, अशी माहिती बेळगाव परिवहन विभागाचे विभागीय नियंत्रक गणेश राठोड यांनी दिली. नुकताच परिवहन मंडळातर्फे चालक दिन साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी गणेश राठोड, के. के. लमाणी, ए. वाय. शिरगुप्पीकर आदी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. बेळगाव विभागातील बसचालकांसाठी सुस्थितीत असलेल्या बसेस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे सार्वजनिक बस वाहतूक अधिक सुरळीत होऊ लागली आहे, अशी माहिती डीटीओ के. के. लमाणी यांनी दिली. यावेळी परिवहनचे अधिकारी, कर्मचारी, बसचालक, वाहक उपस्थित होते.