रेल्वेगाड्या रद्द, विमानोड्डाणे बंद…

रेमेल चक्रीवादळापासून पूर्व किनारपट्टीवर सावधगिरी : कोलकात्यात मुसळधार पाऊस वृत्तसंस्था/ कोलकाता बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे ऊपांतर ‘रेमेल’ चक्रीवादळात झाले आहे. रविवारी मध्यरात्री पश्चिम बंगालमधील सागर बेट आणि बांगलादेशातील खेपुपारा दरम्यानच्या किनारपट्टीवर वादळ धडकण्याची शक्मयता गृहित धरून सावधगिरीच्या सर्व उपाययोजना सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोलकाता […]

रेल्वेगाड्या रद्द, विमानोड्डाणे बंद…

रेमेल चक्रीवादळापासून पूर्व किनारपट्टीवर सावधगिरी : कोलकात्यात मुसळधार पाऊस
वृत्तसंस्था/ कोलकाता
बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे ऊपांतर ‘रेमेल’ चक्रीवादळात झाले आहे. रविवारी मध्यरात्री पश्चिम बंगालमधील सागर बेट आणि बांगलादेशातील खेपुपारा दरम्यानच्या किनारपट्टीवर वादळ धडकण्याची शक्मयता गृहित धरून सावधगिरीच्या सर्व उपाययोजना सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोलकाता विमानतळ रविवारपासून बंद ठेवत जवळपास चारशे विमानसेवा रोखण्यात आल्या. तसेच किनारपट्टी भागातील रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या असून आता वादळ ओसरल्यानंतरच सर्व सेवा पुन्हा सक्रीय केल्या जाणार आहेत. रेमेलल चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस पडणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 110 किमीवरून 120 किमी प्रतितासापर्यंत जाऊ शकतो. किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग ताशी 135 किमीपर्यंत जाण्याची शक्यता असल्यामुळे ओडिशापासून पश्चिम बंगालपर्यंतच्या मच्छिमारांना रविवारी समुद्रात सोडण्यात आले नव्हते. आपत्कालीन परिस्थितीत लोकांना मदत करता यावी यासाठी एनडीआरएफचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. लोकांना समुद्रकिनाऱ्यावर विनाकारण न जाण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
रेमेल चक्रीवादळाचा सर्वाधिक परिणाम पश्चिम बंगालवर होणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. येथील सागर बेटावर हे वादळ धडकणार आहे. मात्र, वादळामुळे पश्चिम बंगाल, किनारी बांगलादेश, त्रिपुरा आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे. यावेळी लोकांना सोसाट्याचा वाऱ्याचाही सामना करावा लागणार आहे. समुद्रकिनाऱ्याजवळ राहणाऱ्या लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या अधिकाऱ्यांनी किनारी भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. सखल भागातूनही लोकांना बाहेर काढले जात आहे. वादळावर बारकाईने लक्ष ठेवले जात असून त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. धोक्याच्या छायेत असलेल्या रेल्वेमार्गावरील बऱ्याच गाड्या रोखण्यात आल्या असून चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतर मार्गाची पडताळणी करूनच सेवा सुरू केली जाणार असल्याचे पूर्व रेल्वेचे सीपीआरओ कौशिक मित्रा यांनी सांगितले.
ओडिशात 20 हजार बोटी किनाऱ्यावर
ओडिशामधील मच्छिमारांनाही सावध करण्यात आले असून सर्व बोटी सुरक्षित ठिकाणी आणण्यात आल्या आहेत. सुमारे 20 हजार मच्छिमारांच्या बोटी किनाऱ्यावर पोहोचल्या आहेत. गेल्या 4-5 दिवसांपासून आम्ही बंगालच्या उपसागरातील रेमेल चक्रीवादळावर लक्ष ठेवून आहोत, असे ओडिशाचे विशेष मदत आयुक्त सत्यब्रत साहू यांनी सांगितले. ओडिशाच्या किनारी जिह्यांमध्ये रविवारी सकाळपासून पाऊस सुरू झाला असून तो आणखी तीव्र होणार आहे.
बांगलादेशातही दक्षता
हजारो बांगलादेशींनी रविवारी किनारपट्टी भागातून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. रेमेल वादळाचा परिणाम जाणवणार असल्याने गेल्या आठवड्यापासूनच येथील लोकांना सूचना जारी करण्यात आल्या होत्या. बांगलादेशच्या हवामान खात्याने ताशी 130 किलोमीटर (81 मैल) वेग असलेल्या जोरदार वाऱ्याचा अंदाज वर्तवला आहे.
विमान प्रवाशांना रिफंडचा पर्याय
स्पाईसजेटने कोलकात्याला जाणारी आणि येणारी सर्व उ•ाणे रद्द केली आहेत. विमाने रद्द केल्यामुळे गैरसोय झालेल्या प्रवाशांना परतावा दिला जाणार आहे. चक्रीवादळामुळे कोलकाता विमानतळावरील सेवा स्थगित करण्यात आली आहेत. रविवारी दुपारी 12 ते सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत कोलकाता विमानतळावरील सर्व फ्लाईट ऑपरेशन्स रद्द करण्यात आली आहेत. 21 तासांसाठी सेवा ठप्प होणार असल्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होणार आहे.