‘करी और सायनाइड’चा ट्रेलर प्रदर्शित

सत्य घटनेवर आधारित माहितीपट नेटफ्लिक्सवर आता सत्यघटनेवर आधारित ‘करी और सायनाइड’ ही क्राइम डॉक्यूमेंट्री प्रदर्शित केली जाणार आहे. या डॉक्यूमेंट्रीचा ट्रेलर निर्मात्यांनी प्रदर्शित केला आहे. हा ट्रेलर पाहिल्यावर हा माहितीपट हत्येचे गूढ दर्शविणारा असल्याचे स्पष्ट होते. याची कहाणी 2002 पासून 2016 दरम्यान झालेल्या 6 लोकांच्या हत्येशी संबंधित आहे. याप्रकरणी आरोपी जॉली जोसेफने कशाप्रकारे स्वत:च्या कुटुंबातील […]

‘करी और सायनाइड’चा ट्रेलर प्रदर्शित

सत्य घटनेवर आधारित माहितीपट
नेटफ्लिक्सवर आता सत्यघटनेवर आधारित ‘करी और सायनाइड’ ही क्राइम डॉक्यूमेंट्री प्रदर्शित केली जाणार आहे. या डॉक्यूमेंट्रीचा ट्रेलर निर्मात्यांनी प्रदर्शित केला आहे. हा ट्रेलर पाहिल्यावर हा माहितीपट हत्येचे गूढ दर्शविणारा असल्याचे स्पष्ट होते. याची कहाणी 2002 पासून 2016 दरम्यान झालेल्या 6 लोकांच्या हत्येशी संबंधित आहे.
याप्रकरणी आरोपी जॉली जोसेफने कशाप्रकारे स्वत:च्या कुटुंबातील 6 जणांना धोकादायक विष सायनाइडच्या मदतीने ठार केले, हे ‘करी और सायनाइड’मध्ये दिसून येणार आहे. ही धक्कादायक घटना केरळ राज्यात घडली होती. याचा ट्रेलर अत्यंत रोमांचित करणारा आहे.
हा ट्रेलर पाहून चाहते नेटफ्लिक्सच्या ‘करी और सायनाइड’ माहितीपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने प्रतीक्षा पाहत आहेत. हा माहितीपट 22 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. द जॉली जोसेफ प्रकरणाने प्रेरित हा माहितीपट पाहणे अत्यंत रजक अनुभव ठरणार आहे.
 

Go to Source