‘क्रॅक’चा ट्रेलर प्रदर्शित

विद्युत जामवाल अन् अर्जुन रामपाल मुख्य भूमिकेत विद्युत जामवाल आणि अर्जुन रामपाल यांची मुख्य भूमिका असलेला हाय व्होल्टेज अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘क्रॅक’चा धमाकेदार ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील अॅक्शनदृश्यं अत्यंत रोमांचित करणारी आहेत. विद्युत पहिल्यांदाच अॅक्शनसोबत कॉमेडी करताना मोठ्या पडद्यावर दिसून येणार आहे.तर या चित्रपटातील नकारात्मक भूमिकेत अर्जुन रामपालही लोकांना पसंत पडत आहे. […]

‘क्रॅक’चा ट्रेलर प्रदर्शित

विद्युत जामवाल अन् अर्जुन रामपाल मुख्य भूमिकेत
विद्युत जामवाल आणि अर्जुन रामपाल यांची मुख्य भूमिका असलेला हाय व्होल्टेज अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘क्रॅक’चा धमाकेदार ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील अॅक्शनदृश्यं अत्यंत रोमांचित करणारी आहेत. विद्युत पहिल्यांदाच अॅक्शनसोबत कॉमेडी करताना मोठ्या पडद्यावर दिसून येणार आहे.तर या चित्रपटातील नकारात्मक भूमिकेत अर्जुन रामपालही लोकांना पसंत पडत आहे.
विद्युत आणि अर्जुनसोबत या चित्रपटात अॅमी जॅक्शन तसेच नोरा फतेही दिसून येणार आहे. विद्युत या चित्रपटात स्वत:च्या भावाच्या मृत्यूचा सूड उगविणाऱ्या नायकाच्या भूमिकेत आहे. तर अर्जुन रामपाल यात एका गुन्हेगारी साम्राज्याच्या अधिपतीची भूमिका साकारत आहे.
ट्रेलरच्या काही ग्लॅमरस दृश्यांमध्sय नोरा फतेही असून यात ती इन्फ्लुंएसरची भुमिका साकारत आहे. तर अॅमी जॅक्सन ही अॅक्शन गर्लच्या भूमिकेत असून चाहत्यांना तिचा हा नवा अवतार आवडत असल्याचे कॉमेंट्स पाहून जाणवते. विद्युतचा स्वत:चा असा चाहतावर्ग असल्याने या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळणार असे मानले जात