‘अमर सिंह चमकीला’चा ट्रेलर सादर
दिलजीत दोसांझ आणि परिणीति चोप्राचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘अमर सिंह चमकीला’चा ट्रेलर सादर करण्यात आला आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट पंजाबी संगीतसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार अमर सिंह चमकीला यांच्या आयुष्यावर आधारित आहे. यात दिलजीत दोसांझने मुख्य भूमिका साकारली आहे. संगीतसृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी अमर सिंह यांना कशाप्रकारे संघर्ष करावा लागला हे या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. परिणीतिने यात अमर सिंह चमकीला यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. अमर सिंह यांनी शून्यातून सुरुवात केली होती. त्यांनी गायनास प्रारंभ केल्यावर त्यांच्यावर अनेक आरोप झाले होते, परंतु तरीही त्यांनी हिंमत न हारता संघर्ष सुरूच ठेवला होता. एकीकडे त्यांची लोकप्रियता वाढत होती, तर दुसरीकडे त्यांचे शत्रूही वाढत होते. त्यांच्यावर अश्लील गाण्यांचा आरोप झाल्याने लोकांचा एक मोठा समूह त्यांच्या विरोधात गेला होता. अमरसिंह चमकीला हे पंजाबच्या लोकांच्या मनावर राज्य करत होते. पंजाबच्या सर्वात महागड्या कलाकारांमध्ये त्यांची गणना व्हायची. चित्रपटात त्यांचा संघर्ष तसेच त्यांच्या हत्येची कहाणी देखील आहे. 1988 मध्ये अमर सिंह हे पत्नी अमरजोतसोबत व्यासपीठावर जात असताना बाइकस्वार हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यात दोघांचाही मृत्यू झाला होता. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 12 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
Home महत्वाची बातमी ‘अमर सिंह चमकीला’चा ट्रेलर सादर
‘अमर सिंह चमकीला’चा ट्रेलर सादर
दिलजीत दोसांझ आणि परिणीति चोप्राचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘अमर सिंह चमकीला’चा ट्रेलर सादर करण्यात आला आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट पंजाबी संगीतसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार अमर सिंह चमकीला यांच्या आयुष्यावर आधारित आहे. यात दिलजीत दोसांझने मुख्य भूमिका साकारली आहे. संगीतसृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी अमर सिंह यांना कशाप्रकारे संघर्ष करावा लागला हे या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले […]
