Mumbai Metro Line 4 च्या कामामुळे ठाणेमध्ये वाहतूक कोंडी
Mumbai Metro Line 4 च्या बांधकामामुळे ठाणेमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. विशेषतः घोडबंदर रोड आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे या व्यस्त मार्गांवर वाहनांची मोठी रांग लागल्याचे दिसून आले.मेट्रो पुलाचे बांधकाम आणि संबंधित पायाभूत सुविधांच्या कामांमुळे रस्त्यावरील उपलब्ध जागा मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. बॅरिकेड्स, बांधकाम साहित्य आणि वाहतुकीसाठी वळवलेले मार्ग यामुळे वाहनांच्या हालचालींना अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, ठाणे आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठा विलंब सहन करावा लागत आहे.विशेषतः पीक अवर्समध्ये ही वाडतूक कोंडी अधिक होते. ऑफिसला जाणारे कर्मचारी, सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक वाहनांनाही त्याचा मोठा फटका बसत आहे.दरम्यान, अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे काम मेट्रो मार्ग पूर्ण करण्यासाठी आणि भविष्यातील प्रवास सुलभ करण्यासाठी अत्यावश्यक आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या कामांमुळे या प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा नेहमीचा प्रवाह तात्पुरता विस्कळीत झाला आहे. रोजच्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.हेही वाचाकामा रुग्णालयात कर्करोग रुग्णांसाठी पॅलिएटिव्ह केअर सेंटर सुरू
Home महत्वाची बातमी Mumbai Metro Line 4 च्या कामामुळे ठाणेमध्ये वाहतूक कोंडी
Mumbai Metro Line 4 च्या कामामुळे ठाणेमध्ये वाहतूक कोंडी
Mumbai Metro Line 4 च्या बांधकामामुळे ठाणेमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. विशेषतः घोडबंदर रोड आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे या व्यस्त मार्गांवर वाहनांची मोठी रांग लागल्याचे दिसून आले.
मेट्रो पुलाचे बांधकाम आणि संबंधित पायाभूत सुविधांच्या कामांमुळे रस्त्यावरील उपलब्ध जागा मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
बॅरिकेड्स, बांधकाम साहित्य आणि वाहतुकीसाठी वळवलेले मार्ग यामुळे वाहनांच्या हालचालींना अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, ठाणे आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठा विलंब सहन करावा लागत आहे.
विशेषतः पीक अवर्समध्ये ही वाडतूक कोंडी अधिक होते. ऑफिसला जाणारे कर्मचारी, सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक वाहनांनाही त्याचा मोठा फटका बसत आहे.
दरम्यान, अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे काम मेट्रो मार्ग पूर्ण करण्यासाठी आणि भविष्यातील प्रवास सुलभ करण्यासाठी अत्यावश्यक आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या कामांमुळे या प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा नेहमीचा प्रवाह तात्पुरता विस्कळीत झाला आहे. रोजच्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.हेही वाचा
कामा रुग्णालयात कर्करोग रुग्णांसाठी पॅलिएटिव्ह केअर सेंटर सुरू
