गणाचारी गल्लीत चेंबर दुरुस्तीमुळे वाहतूक कोंडी

बेळगाव : गणाचारी गल्लीच्या प्रवेशद्वारावरच ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली असून त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. या कोंडीमुळे वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून गणाचारी गल्ली, कंग्राळ गल्ली या परिसरात ड्रेनेजची समस्या डोकेवर काढत आहे. त्यामुळे ब्लॉक झालेल्या ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती […]

गणाचारी गल्लीत चेंबर दुरुस्तीमुळे वाहतूक कोंडी

बेळगाव : गणाचारी गल्लीच्या प्रवेशद्वारावरच ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली असून त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. या कोंडीमुळे वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून गणाचारी गल्ली, कंग्राळ गल्ली या परिसरात ड्रेनेजची समस्या डोकेवर काढत आहे. त्यामुळे ब्लॉक झालेल्या ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती करावी, अशी मागणी नगरसेवक शंकर पाटील यांनी महापालिकेमध्ये केली होती. याचबरोबर त्यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती करण्यात येत आहे. त्या ठिकाणी काँक्रिट घालण्याचे काम करण्यात येत आहे. खोदाई करून त्यानंतर त्याची दुरुस्ती करण्यात येत असल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र त्यामुळे शनिवारखूट, काकतीवेस रोड, रिसालदार गल्ली या परिसरात वाहतुकीची कोंडी होत आहे. यातच रिसालदार गल्लीमध्येही गटारी स्वच्छ करण्यात येत आहेत. त्यामुळे गटारीच्या बाजूला माती व कचऱ्याचे ढीग पडून असल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा मनपाने लवकरात लवकर या परिसरातील काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.