न्यायालय आवारात पुन्हा वाहतूक कोंडी
बार असोसिएशन लक्ष देणार का? : किमान वकिलांनी तरी गांभीर्याने घ्यावे
बेळगाव : न्यायालयाच्या आवारात वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. पावसाळा सुरू झाल्याने वकील मोठ्या संख्येने चारचाकी वाहने घेऊन येत आहेत. परिणामी पार्किंगसाठी जागाच उपलब्ध होणे अशक्य झाले आहे. बुधवारी तब्बल तासाभराहून अधिक वेळ वाहतूक कोंडी झाल्याने सारेच वैतागले होते. या वाहतूक कोंडी आणि पार्किंग समस्येकडे बार असोसिएशन लक्ष देणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जेएमएफसी न्यायालयाच्या आवारामध्ये ही वाहतूक कोंडी वारंवार होत आहे. नूतन कौटुंबीक न्यायालयासमोर पार्किंगसाठी जागा उपलब्ध आहे. मात्र, रस्त्यावरच चारचाकी पार्किंग करणे आणि न्यायालयात निघून जाणे, असे प्रकार घडत आहेत. काही वकील आणि काही पक्षकार अशा प्रकारे वाहने पार्किंग करत आहेत. त्यामुळे ही समस्या निर्माण होत असल्याचा आरोप होत आहे. तेव्हा किमान वकिलांनी याबाबत गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे.
पार्किंगला शिस्त लावण्याची मागणी
मंगळवारी पावसाची रिपरिप सुरू होती. यातच वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे दुचाकीस्वारांना आणि पादचाऱ्यांनाही अडकून पडावे लागले. काही जणांना न्यायालयात वेळेत हजर होणेही अशक्य झाले. परिणामी अनेकांना वॉरंट निघण्याची भीती व्यक्त होत आहे. वारंवार असा प्रकार घडत आहे. तेव्हा बार असोसिएशनने लक्ष देऊन पार्किंगला शिस्त लावावी, अशी मागणी होत आहे.
Home महत्वाची बातमी न्यायालय आवारात पुन्हा वाहतूक कोंडी
न्यायालय आवारात पुन्हा वाहतूक कोंडी
बार असोसिएशन लक्ष देणार का? : किमान वकिलांनी तरी गांभीर्याने घ्यावे बेळगाव : न्यायालयाच्या आवारात वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. पावसाळा सुरू झाल्याने वकील मोठ्या संख्येने चारचाकी वाहने घेऊन येत आहेत. परिणामी पार्किंगसाठी जागाच उपलब्ध होणे अशक्य झाले आहे. बुधवारी तब्बल तासाभराहून अधिक वेळ वाहतूक कोंडी झाल्याने सारेच वैतागले होते. या वाहतूक कोंडी आणि पार्किंग समस्येकडे बार असोसिएशन लक्ष देणार का? […]