फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या दौऱ्यामुळे दक्षिण मुंबईत ट्रॅफिक
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मंगळवार, 17 फेब्रुवारी 2026 रोजी दक्षिण मुंबईत (south mumbai) विशेष वाहतूक निर्बंध (No entry) लागू करण्याची घोषणा केली आहे. नवशक्तीने दिलेल्या वृत्तानुसार, उच्चस्तरीय भेटीमुळे गेटवे परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीत (traffic) बदल करण्यात आले आहेत.गेटवे ऑफ इंडिया (gateway of india) येथे ‘इंडिया-फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन’ या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम फ्रान्सच्या वाणिज्य दूतावासातर्फे 14 ते 22 फेब्रुवारीदरम्यान आयोजित उपक्रमाचा भाग आहे. तसेच, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या भेटीदरम्यान ताज महाल पॅलेस येथे ‘इंडिया-फ्रान्स इनोव्हेशन फोरम’ होणार आहे. या फोरममध्ये दोन्ही देशांतील उद्योगपती, स्टार्टअप उद्योजक, संशोधक आणि धोरणकर्ते सहभागी होणार आहे. नवकल्पना आणि तंत्रज्ञान सहकार्यावर चर्चा होणार आहे.कधी आणि कुठे निर्बंध?दिनांक : 17 फेब्रुवारी 2026वेळ : दुपारी 2.00 ते रात्री 9.00क्षेत्र : गेटवे ऑफ इंडिया परिसर व आजूबाजूचे मार्गअत्यावश्यक वाहनांना सूट : रुग्णवाहिका, पोलीस, अग्निशमन, व्हीआयपी व अत्यावश्यक सेवा वाहनेबंद राहणारे प्रमुख मार्ग1) छत्रपती शिवाजी महाराज मार्गश्यामप्रसाद मुखर्जी चौक (रिगल जंक्शन) ➝ गेटवे ऑफ इंडिया ➝ ॲडम स्ट्रीट ➝ पी. रामचंदानी मार्ग ➝ जोकिम अल्वा चौक (नॉर्थ कोर्ट)सर्वसामान्य वाहनांसाठी बंद (आपत्कालीन सेवा वगळून)2) पी. रामचंदानी मार्गजोकिम अल्वा चौक ➝ ॲडम स्ट्रीट : या दिशेने येणाऱ्या वाहनांना प्रतिबंधपर्यायी मार्गरिगल जंक्शनकडून पुढे जाण्यासाठी :रिगल जंक्शन ➝शहीद भगतसिंग मार्ग ➝महाकवी भूषण मार्ग ➝उजवे वळण ➝बी. के. बोमण बेहराम मार्ग ➝ पुढे इच्छित स्थळरिगल कडून रेडिओ क्लबकडे :रिगल➝एस.बी.एस. रोड ➝इलेक्ट्रिक हाऊस जंक्शन➝बेस्ट मार्ग➝अल्वा चौक➝उजवे वळण ➝पी. रामचंदानी मार्ग➝रेडिओ क्लबरेडिओ क्लबकडून रिगलकडे :रेडिओ क्लब➝पी. रामचंदानी मार्ग➝अल्वा चौक➝डावे वळण➝बेस्ट मार्ग➝पुढे इच्छित स्थळबसथांबे व टॅक्सी स्टँडॲडम स्ट्रीट आणि पी. रामचंदानी मार्गावरील BEST बसथांबे व टॅक्सी स्टँड तात्पुरते बंद राहतील.कोणत्या मार्गांवर नो-पार्किंग झोन?नाथालाल पारेख मार्गजगन्नाथ भोसले मार्गकॅप्टन प्रकाश पेठे मार्गरामभाऊ साळगांवकर मार्गशहीद भगतसिंग मार्गबी. के. बोमण बेहराम मार्ग (ताज हॉटेल मागील भाग ते हॉटेल डिप्लोमॅटपर्यंत)मुंबई (mumbai) पोलिसांनी (mumbai police) नागरिकांना आधीच प्रवासाचे नियोजन करण्याचे, शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमामुळे दक्षिण मुंबईत मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.हेही वाचामुंबई महानगर प्रदेशात ‘पॉड टॅक्सी’साठी नगरपालिकांनी आराखडा तयार करावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमहाराष्ट्रात नव्या रेल्वे प्रकल्पाची घोषणा
Home महत्वाची बातमी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या दौऱ्यामुळे दक्षिण मुंबईत ट्रॅफिक
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या दौऱ्यामुळे दक्षिण मुंबईत ट्रॅफिक
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मंगळवार, 17 फेब्रुवारी 2026 रोजी दक्षिण मुंबईत (south mumbai) विशेष वाहतूक निर्बंध (No entry) लागू करण्याची घोषणा केली आहे.
नवशक्तीने दिलेल्या वृत्तानुसार, उच्चस्तरीय भेटीमुळे गेटवे परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीत (traffic) बदल करण्यात आले आहेत.
गेटवे ऑफ इंडिया (gateway of india) येथे ‘इंडिया-फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन’ या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम फ्रान्सच्या वाणिज्य दूतावासातर्फे 14 ते 22 फेब्रुवारीदरम्यान आयोजित उपक्रमाचा भाग आहे.
तसेच, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या भेटीदरम्यान ताज महाल पॅलेस येथे ‘इंडिया-फ्रान्स इनोव्हेशन फोरम’ होणार आहे.
या फोरममध्ये दोन्ही देशांतील उद्योगपती, स्टार्टअप उद्योजक, संशोधक आणि धोरणकर्ते सहभागी होणार आहे. नवकल्पना आणि तंत्रज्ञान सहकार्यावर चर्चा होणार आहे.
कधी आणि कुठे निर्बंध?
दिनांक : 17 फेब्रुवारी 2026वेळ : दुपारी 2.00 ते रात्री 9.00क्षेत्र : गेटवे ऑफ इंडिया परिसर व आजूबाजूचे मार्गअत्यावश्यक वाहनांना सूट : रुग्णवाहिका, पोलीस, अग्निशमन, व्हीआयपी व अत्यावश्यक सेवा वाहनेबंद राहणारे प्रमुख मार्ग
1) छत्रपती शिवाजी महाराज मार्गश्यामप्रसाद मुखर्जी चौक (रिगल जंक्शन) ➝ गेटवे ऑफ इंडिया ➝ ॲडम स्ट्रीट ➝ पी. रामचंदानी मार्ग ➝ जोकिम अल्वा चौक (नॉर्थ कोर्ट)सर्वसामान्य वाहनांसाठी बंद (आपत्कालीन सेवा वगळून)2) पी. रामचंदानी मार्ग
जोकिम अल्वा चौक ➝ ॲडम स्ट्रीट : या दिशेने येणाऱ्या वाहनांना प्रतिबंध
पर्यायी मार्गरिगल जंक्शनकडून पुढे जाण्यासाठी :रिगल जंक्शन ➝शहीद भगतसिंग मार्ग ➝महाकवी भूषण मार्ग ➝उजवे वळण ➝बी. के. बोमण बेहराम मार्ग ➝ पुढे इच्छित स्थळरिगल कडून रेडिओ क्लबकडे :रिगल➝एस.बी.एस. रोड ➝इलेक्ट्रिक हाऊस जंक्शन➝बेस्ट मार्ग➝अल्वा चौक➝उजवे वळण ➝पी. रामचंदानी मार्ग➝रेडिओ क्लबरेडिओ क्लबकडून रिगलकडे :रेडिओ क्लब➝पी. रामचंदानी मार्ग➝अल्वा चौक➝डावे वळण➝बेस्ट मार्ग➝पुढे इच्छित स्थळ
बसथांबे व टॅक्सी स्टँडॲडम स्ट्रीट आणि पी. रामचंदानी मार्गावरील BEST बसथांबे व टॅक्सी स्टँड तात्पुरते बंद राहतील.कोणत्या मार्गांवर नो-पार्किंग झोन?नाथालाल पारेख मार्गजगन्नाथ भोसले मार्गकॅप्टन प्रकाश पेठे मार्गरामभाऊ साळगांवकर मार्गशहीद भगतसिंग मार्गबी. के. बोमण बेहराम मार्ग (ताज हॉटेल मागील भाग ते हॉटेल डिप्लोमॅटपर्यंत)मुंबई (mumbai) पोलिसांनी (mumbai police) नागरिकांना आधीच प्रवासाचे नियोजन करण्याचे, शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमामुळे दक्षिण मुंबईत मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.हेही वाचा
मुंबई महानगर प्रदेशात ‘पॉड टॅक्सी’साठी नगरपालिकांनी आराखडा तयार करावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्रात नव्या रेल्वे प्रकल्पाची घोषणा
