टिळकवाडीत वाहतुकीला शिस्त
वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न : विनाहेल्मेट चालकांवर कारवाई : आरपीडी कॉर्नरसह इतर भागात हेल्मेट तपासणी मोहीम
बेळगाव : वाहतूक पोलिसांनी टिळकवाडी परिसरात वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम हाती घेतले आहे. देशमुख रोड परिसरात सम-विषम पार्किंगसाठी प्रयत्न करण्यात येत असून आरपीडी कॉर्नरसह इतर भागात हेल्मेट तपासणीची मोहीम राबविण्यात आली. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या सूचनेवरून वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेले दोन दिवस देशमुख रोड परिसरात सम-विषम पार्किंगसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केल्यामुळे वाहतुकीस अडथळे येत आहे. त्यामुळे सम-विषमचा प्रयोग राबविण्यात येत आहे. हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करण्यासाठीही मोहीम हाती घेण्यात आली आहे. खासकरून ज्या परिसरात कॉलेज आहेत, त्या परिसरात विद्यार्थी दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करीत नाहीत. हे लक्षात आल्याने स्वत: पोलीस आयुक्तांनीच मोहीम राबविण्याची सूचना केली आहे. त्यामुळे गेले दोन दिवस आरपीडी कॉर्नरसह वेगवेगळ्या परिसरात हेल्मेट तपासणीची मोहीम सुरू आहे.
Home महत्वाची बातमी टिळकवाडीत वाहतुकीला शिस्त
टिळकवाडीत वाहतुकीला शिस्त
वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न : विनाहेल्मेट चालकांवर कारवाई : आरपीडी कॉर्नरसह इतर भागात हेल्मेट तपासणी मोहीम बेळगाव : वाहतूक पोलिसांनी टिळकवाडी परिसरात वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम हाती घेतले आहे. देशमुख रोड परिसरात सम-विषम पार्किंगसाठी प्रयत्न करण्यात येत असून आरपीडी कॉर्नरसह इतर भागात हेल्मेट तपासणीची मोहीम राबविण्यात आली. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. […]