पहिले रेल्वेगेट परिसरात पुन्हा वाहतूक कोंडी

बेळगाव : टिळकवाडी येथील पहिले व दुसरे रेल्वेगेट परिसरात रेल्वे बराचवेळ थांबल्यामुळे वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. बुधवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास पहिले रेल्वेगेट येथे बराचकाळ रेल्वे थांबल्याने गेट उघडले गेले नाही. यामुळे रेल्वेगेटच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मागील आठवड्याभरात वाहतूक कोंडी झाल्यामुळे तब्बल 20 ते 25 मिनिटे काँग्रेस रोडवर वाहनांच्या […]

पहिले रेल्वेगेट परिसरात पुन्हा वाहतूक कोंडी

बेळगाव : टिळकवाडी येथील पहिले व दुसरे रेल्वेगेट परिसरात रेल्वे बराचवेळ थांबल्यामुळे वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. बुधवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास पहिले रेल्वेगेट येथे बराचकाळ रेल्वे थांबल्याने गेट उघडले गेले नाही. यामुळे रेल्वेगेटच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मागील आठवड्याभरात वाहतूक कोंडी झाल्यामुळे तब्बल 20 ते 25 मिनिटे काँग्रेस रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बुधवारी सायंकाळी 6.30 वाजता रेल्वेस्थानकातून आलेले एक इलेक्ट्रीक इंजीन पहिले रेल्वेगेट परिसरात थांबले. त्यानंतर पुन्हा रेल्वे स्थानकाकडे गेले. त्यानंतर काहीवेळातच मालवाहू रेल्वे आल्याने रेल्वेगेट उघडलेच नाही. बराचवेळ रेल्वेगेट बंद ठेवल्याने वाहतूक कोंडी झाली होती.