शहरात पारंपरिक शिवजयंती साजरी

उद्या चित्ररथ मिरवणूक : शिवप्रेमी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह बेळगाव : शहरात गुऊवारी पारंपरिक पध्दतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळातर्फे नरगुंदकर भावे चौक येथे छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी समिती नेते रणजीत चव्हाण-पाटील, मालोजी अष्टेकर, रमाकांत कोंडुस्कर, रेणू किल्लेकर, मदन बामणे, महादेव पाटील, नगरसेवक शिवाजी मंडोळकर आदींच्या […]

शहरात पारंपरिक शिवजयंती साजरी

उद्या चित्ररथ मिरवणूक : शिवप्रेमी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
बेळगाव : शहरात गुऊवारी पारंपरिक पध्दतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळातर्फे नरगुंदकर भावे चौक येथे छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी समिती नेते रणजीत चव्हाण-पाटील, मालोजी अष्टेकर, रमाकांत कोंडुस्कर, रेणू किल्लेकर, मदन बामणे, महादेव पाटील, नगरसेवक शिवाजी मंडोळकर आदींच्या उपस्थितीत विधीवत पूजन व आरती करण्यात आली. धर्मवीर संभाजी चौक येथे सकाळपासून विविध गडकिल्ल्यांवरुन आणण्यात आलेल्या शिवज्योतींचे उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर छ. शिवाजी उद्यानात शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करुन वंदन करण्यात आले. यावेळी शिवभक्त आणि समिती कार्यकर्त्यांनी शिवरायांचा जयजयकार करुन उद्यान दणाणून सोडले. छ. शिवाजी महाराज की जय, जय भवानी-जय शिवाजी अशा घोषणा देवून प्रेरणा जागृत केली. पहाटेपासून विविध गडकिल्ल्यांवरुन शिवभक्त ज्योत घेऊन ध. संभाजी चौकाकडे मार्गस्थ झाले. यावेळी शिवज्योतींचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. विविध मार्गावर शिवप्रेमींनी छ. शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत ध. संभाजी चौकाकडे कुच केली.
गल्लोगल्ली छ. शिवाजी महाराजांना वंदन
पारंपरिक शिवजयंती निमित्त गल्लोगल्ली आणि चौकाचौकांमध्ये शिवपुतळे आणि शिव प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे स्मरण करुन त्यांना वंदन करण्यात आले. यावेळी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगावच्या शिवजयंतीला मोठा इतिहास आणि परंपरा आहे. त्यामुळे शिवजयंतीसाठी शिवप्रेमींबरोबर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. गुऊवारी शिवजयंतीला प्रारंभ झाला असून शनिवार दि. 11 रोजी शहरात भव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. सायंकाळी 6 वाजता मान्यवरांच्या हस्ते या मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. विशेषत: शिवरायांच्या काळातील जाज्ज्वल इतिहासाचे आकर्षण राहणार आहे. यासाठी शिवभक्तांची धडपड सुरू आहे.