टोयोटाची नवी रुमियन बाजारात लाँच

नवी दिल्ली : टोयोटा कंपनीने आपली नवी रुमियन ही एमपीव्ही गटातील गाडी नुकतीच बाजारात लॉन्च केली आहे. रूमियन जी एटी ही आपली नवी एमपीव्ही गटातील कार कंपनीने सहा स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध केली असून ग्राहकांना 13 लाख रुपये किमतीमध्ये (एक्स शोरूम किंमत) ही कार खरेदी करता येणार आहे. मॅन्युअल व्हेरिएंट कारच्या तुलनेमध्ये हे मॉडेल 1.40 […]

टोयोटाची नवी रुमियन बाजारात लाँच

नवी दिल्ली :
टोयोटा कंपनीने आपली नवी रुमियन ही एमपीव्ही गटातील गाडी नुकतीच बाजारात लॉन्च केली आहे. रूमियन जी एटी ही आपली नवी एमपीव्ही गटातील कार कंपनीने सहा स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध केली असून ग्राहकांना 13 लाख रुपये किमतीमध्ये (एक्स शोरूम किंमत) ही कार खरेदी करता येणार आहे.
मॅन्युअल व्हेरिएंट कारच्या तुलनेमध्ये हे मॉडेल 1.40 लाख रुपयाने महाग आहे. 11 हजार रुपये टोकन रक्कम भरून सदरची नवी गाडी ग्राहकांना बुक करता येणार आहे. एस, जी आणि व्ही या तीन प्रकारांमध्ये कंपनीने रुमियन जी ही कार सादर केली आहे.
कारमध्ये या आहेत सुविधा
या कारमध्ये दोन टोन अलॉय व्हील, ड्युअल टोन सीट फॅब्रिक,  की लेस एंट्री, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, सात इंचाचा इन्फोटेनमेंट टचक्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्ले, फ्रंट फ्रॉग यासारख्या सुविधा  देण्यात आल्या आहेत.