शिरोडा-वेळागर येथील श्रीदेव लिंगेश्वराचा उद्या २३ वा वर्धापन दिन

शिरोडा (प्रतिनिधी)- शिरोडा-वेळागर येथील श्री देव लिंगेश्वर मंदिरांचा २३ वा वर्धापन दिन रविवार दि ८ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातून संपन्न होणार आहे. यासाठी श्रीदेवी लिंगेश्वर देवस्थान समिती विश्वस्त सल्लागार व उत्सव कमिटी यांनी भव्य दिव्य असे नियोजन केलेले आहे.शिरोडा-वेळागर येथील श्री देव लिंगेश्वर मंदिर वर्धापनदिन सोहळा रविवार दि. ८ फेब्रुवारी […]

शिरोडा-वेळागर येथील श्रीदेव लिंगेश्वराचा उद्या २३ वा वर्धापन दिन

शिरोडा (प्रतिनिधी)-
शिरोडा-वेळागर येथील श्री देव लिंगेश्वर मंदिरांचा २३ वा वर्धापन दिन रविवार दि ८ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातून संपन्न होणार आहे. यासाठी श्रीदेवी लिंगेश्वर देवस्थान समिती विश्वस्त सल्लागार व उत्सव कमिटी यांनी भव्य दिव्य असे नियोजन केलेले आहे.शिरोडा-वेळागर येथील श्री देव लिंगेश्वर मंदिर वर्धापनदिन सोहळा रविवार दि. ८ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. त्या निमीत्त सकाळी ८ वाजता धार्मिक विधी, लघुरुद्र, सकाळी ९ वाजता वरदशंकर महापूजा, दुपारी १२ वाजता आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १२.३० ते ३ वाजेपर्यत महाप्रसाद, संध्याकाळी ६ ते ७ वाजता भाविकांची भजने, रात्री ७ ते ८ वाजता ‘श्री’ ची पालखी, रात्रौ ८ ते ९ वाजता बक्षिस वितरण समारंभ रात्री १० वाजता खानोलकर दशावतारी नाट्य मंडळाच्या दणदणीत दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तसेच रविवार दि. १५ फेब्रुवारी महाशिवरात्री उत्सव साजरा होणार आहे. त्यानिमित्त सकाळी ८ वाजता धार्मिक विधी, अभिषेक, संध्याकाळी ४ वाजता किर्तन, सायंकाळी ४ ते ७ वाजता भाविकांची भजने, सायंकाळी ७ वाजता ‘श्रीं’ ची पालखी, रात्री ८ वाजता सातपाटेश्वर दशावतार नाट्यमंडळ यांचा दणदणीत दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.श्री देव लिंगेश्वर मंदिरांत होणाऱ्या वर्धापन दिन सोहळा व महाशिवरात्री उत्सव ,कार्यक्रमांचा भाविकांनी बहुसंख्येने लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव लिंगेश्वर देवस्थान समिती व सल्लागार यांच्यातर्फे करण्यात आले आहे.