टॉमी पॉल विजेता
वृत्तसंस्था/ डल्लास
येथे झालेल्या डल्लास ओपन एटीपी स्पर्धेत अमेरिकेच्या टॉमी पॉलने आपल्याच देशाच्या मार्कोस गिरॉनचा पराभव करून अजिंक्यपद मिळविले. टूरवरील त्याचे हे दुसरे जेतेपद आहे.
अंतिम फेरीत टॉमी पॉलने गिरॉनवर 7-6 (7-3), 5-7, 6-3 अशी मात केली. जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानावर असणाऱ्या पॉलने यापूर्वी 2021 मध्ये स्टॉकहोम स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. मात्र गेल्या वर्षी अॅकापुल्को व ईस्टबोर्न येथील स्पर्धांत अंतिम फेरीत त्याला पराभूत व्हावे लागले होते. गिरॉनने या स्पर्धेत अग्रमानांकित फ्रान्सेस टायफो व चौथ्या मानांकित अॅड्रियन मॅनारिनोला पराभवाचे धक्के दिले होते. गिरॉनची ही एटीपीमधील दुसरी अंतिम लढत होती. यापूर्वी 2022 मध्ये सॅन दिएगो स्पर्धेतही त्याला उपविजेतेपद मिळाले होते.
Home महत्वाची बातमी टॉमी पॉल विजेता
टॉमी पॉल विजेता
वृत्तसंस्था/ डल्लास येथे झालेल्या डल्लास ओपन एटीपी स्पर्धेत अमेरिकेच्या टॉमी पॉलने आपल्याच देशाच्या मार्कोस गिरॉनचा पराभव करून अजिंक्यपद मिळविले. टूरवरील त्याचे हे दुसरे जेतेपद आहे. अंतिम फेरीत टॉमी पॉलने गिरॉनवर 7-6 (7-3), 5-7, 6-3 अशी मात केली. जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानावर असणाऱ्या पॉलने यापूर्वी 2021 मध्ये स्टॉकहोम स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. मात्र गेल्या वर्षी […]