आजच्या पिढीने शिवचरित्राचे वाचन करणे आवश्यक

सांबरा येथील जाहीर सभेत संभाजीराव भिडे गुरुजी यांचे आवाहन
वार्ताहर /सांबरा
छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याला एक नवी दिशा दाखविली आहे. त्यांना जर समजून घ्यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराजांना प्रत्येकाने आपल्या अंत:करणात बिंबवून आचरण केले पाहिजे. त्यांचे बलिदान हे हिंदुस्थानच्या भवितव्याशी कायमचे जोडलेले राहणार आहे. यासाठी त्यांना समजून घ्यायचे असेल तर शिवचरित्राचे वाचन करा. तसेच बलिदान मासचे आचरण करा, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी केले. शुक्रवार दि. 8 रोजी सायंकाळी सांबरा येथे आयोजित सभेमध्ये बोलत होते. ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराजांचे बलिदान हिंदुस्थानच्या भवितव्याशी कायमचे जोडलेले राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज हे जर जन्माला आले नसते तर गुलामगिरी पत्करावी लागली असती. हिंदू धर्मही राहिला नसता. शिवाजी महाराजांनी देशाला देशभक्ती व स्वाभिमान दिला. ज्याप्रमाणे आपले तहान, भूक व झोप याबरोबर अतूट नाते आहे, तसेच शिवाजी महाराज व संभाजी महाराजांना आपल्या अंत:करणात बिंबवले पाहिजे. संभाजी महाराजांनी केशव उमाजी पंडित यांच्याकडे हिंदू धर्म संस्कृतीचे धडे घेतले. संभाजी महाराजांकडे प्रचंड बुद्धिमत्ता होती. त्यांनी संस्कृत, मराठी व हिंदी भाषेमध्ये एकूण सहा ग्रंथ लिहिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी 35 वर्षांत 289 लढाया लढल्या. त्यापैकी ते 60 पराभूत झाले.
संभाजी महाराजांनी पावणेनऊ वर्षांमध्ये 134 लढाया लढल्या व सर्व लढाया ते जिंकले. केवळ पावणेनऊ वर्षात स्वराज्याचा विस्तार तिपटीने वाढविला. संभाजी महाराजांनी शत्रूंना सळो की पळो करून सोडले होते. अशा छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना औरंगजेबाने कपटाने कैद केले व त्यांच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला. तरीही संभाजी महाराज त्याच्यासमोर झुकले नाहीत. त्यांनी जीव गेला तरी धर्म सोडला नाही. संभाजी महाराजांचे अनेक दिवस हालहाल केले. त्यांनी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान फार मोठे आहे. भविष्यात त्यांचे बलिदान हे भावी पिढीसमोर एक आदर्श निर्माण करत राहणार आहे. यासाठीच बलिदान मासचे पालन करणे हे हिंदूचे कर्तव्य आहे. प्रारंभी संभाजीराव भिडे गुरुजी यांचे आगमन होताच पुष्पवृष्टी करून स्वागत केले. याप्रसंगी कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे यांनी शिवमूर्तीचे पूजन केले. ग्रामस्थांतर्फे गुरुजींचा सत्कार देवस्थान कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई व ग्रा. पं. उपाध्यक्ष मारुती जोगाणी यांनी केला. सभेला किरण गावडे, जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील, तालुकाप्रमुख परशुराम कोकीतकर, तालुका कार्यवाहक कल्लाप्पा पाटील, शहरप्रमुख अनंत चौगुले, कणबर्गी विभाग प्रमुख हिरामणी मुचंडीकर, पूर्व विभाग प्रमुख प्रवीण मुरारी, उपविभाग प्रमुख मोहन जोई यांसह धारकरी उपस्थित होते.
टीव्ही-मोबाईलचा त्याग करा
टीव्ही व मोबाईल ही समाजाला लागलेली कीड आहे. तरुणांना जर कशाचा त्याग करायचा असेल तर त्यांनी प्रथम टीव्ही व मोबाईलचा त्याग करावा. दररोज नित्यनेमाने शिवचरित्राचे वाचन करावे व आपल्या धर्माप्रती कट्टर बनावे, असा सल्लाही भिडे गुरुजींनी तरुणांना दिला.

Home महत्वाची बातमी आजच्या पिढीने शिवचरित्राचे वाचन करणे आवश्यक
आजच्या पिढीने शिवचरित्राचे वाचन करणे आवश्यक
सांबरा येथील जाहीर सभेत संभाजीराव भिडे गुरुजी यांचे आवाहन वार्ताहर /सांबरा छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याला एक नवी दिशा दाखविली आहे. त्यांना जर समजून घ्यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराजांना प्रत्येकाने आपल्या अंत:करणात बिंबवून आचरण केले पाहिजे. त्यांचे बलिदान हे हिंदुस्थानच्या भवितव्याशी कायमचे जोडलेले राहणार आहे. […]
