तिरुपती-बेळगाव विमानफेरी अचानक रद्द
बेळगावच्या प्रवाशांमधून संताप
बेळगाव : तिरुपतीहून बेळगावला येणारी स्टार एअरची विमानफेरी सोमवारी अचानक रद्द करण्यात आली. बेळगावला येण्यासाठी तिरुपती विमानतळावर दाखल झालेल्या प्रवाशांना यामुळे फटका बसला. प्रवाशांनी विमानतळावर संताप व्यक्त करत विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. श्रीक्षेत्र तिरुपती येथून बेळगावला स्टार एअर कंपनी विमानसेवा देते. नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता विमानफेरी होती. प्रवासी वेळेप्रमाणे विमान विमानतळावर दाखल झाले. विमान निघण्यास काही वेळ शिल्लक असताना कंपनीने विमानफेरी रद्द करण्यात आल्याचे सांगितले. तांत्रिक कारण देत स्टार एअरने विमानफेरी रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. महत्त्वाच्या कामांसाठी बेळगावला येणाऱ्या प्रवाशांना या गैरसोयीचा सामना करावा लागला. पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवाशांनी विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे केली. या प्रकारामुळे तिरुपती विमानतळावर गोंधळ निर्माण झाला होता. यापूर्वीदेखील अनेक वेळा विमानफेरी रद्द केल्याने प्रवाशांचा रोष पत्करावा लागला होता. बेळगाव तसेच अथणी येथील बरेच प्रवासी तिरुपती विमानतळावर अडकून पडले होते.
Home महत्वाची बातमी तिरुपती-बेळगाव विमानफेरी अचानक रद्द
तिरुपती-बेळगाव विमानफेरी अचानक रद्द
बेळगावच्या प्रवाशांमधून संताप बेळगाव : तिरुपतीहून बेळगावला येणारी स्टार एअरची विमानफेरी सोमवारी अचानक रद्द करण्यात आली. बेळगावला येण्यासाठी तिरुपती विमानतळावर दाखल झालेल्या प्रवाशांना यामुळे फटका बसला. प्रवाशांनी विमानतळावर संताप व्यक्त करत विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. श्रीक्षेत्र तिरुपती येथून बेळगावला स्टार एअर कंपनी विमानसेवा देते. नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता विमानफेरी होती. प्रवासी वेळेप्रमाणे विमान […]